शहरं
Join us  
Trending Stories
1
Chirag Paswan : "मी कोणालाच घाबरत नाही..."; पंतप्रधान मोदींसोबतच्या नात्याबद्दल चिराग पासवान यांचा खुलासा
2
माझी प्रचंड खिल्ली उडवली गेली, पण मी गप्प राहिलो; कारण..., पंतप्रधान मोदी स्पष्टच बोलले
3
Shikhar Dhawan Video: गब्बर इज बॅक!! निवृत्तीनंतर पुन्हा एकदा शिखर धवनच्या हाती बॅट, केली तुफान फटकेबाजी
4
CM शिंदे दक्ष, नाराजांवर लक्ष! विधानसभेआधी तीन नेत्यांचे राजकीय पुनर्वसन
5
"बासरीने काम चालणार नाही, सुदर्शन चक्र..."; असं का म्हणाले योगी आदित्यनाथ? कुणाचं नाव घेतलं?
6
Rohit Sharma Virat Kohli, IND vs BAN 1st Test: विराटचा केवळ २ गोलंदाजांसह सराव, रोहितचा तर वेगळाच प्लॅन! दिग्गजांच्या डोक्यात नक्की काय?
7
मुख्यमंत्र्यांनी शब्द पाळला, लोकसभेत तिकीट कापलेल्या हेमंत पाटलांना मंत्रिपदाचा दर्जा
8
Suraj Chavan : गुलीगत फेम सूरज चव्हाणला मिळणार मैत्रीण... फळ्यावर हार्ट इमोजी, त्यात कोरलंय S; 'ती' कोण?
9
भाजपाने युती धर्म पाळला असता, तर शिंदेंचे चार खासदार वाढले असते -बच्चू कडू
10
अरविंद केजरीवालांच्या राजीनाम्याची वेळ ठरली? महत्त्वाची अपडेट
11
Arjun Tendulkar Video: Video: अर्जुन तेंडुलकरचा धमाका! ९ विकेट्स घेत फिरवला 'गेम'; संघाला मिळवून दिला विजय
12
एका एपिसोडसाठी लाखो रुपये घेते 'ही' ग्लॅमरस गर्ल; नेटवर्थ समजताच व्हाल हैराण
13
महायुतीचा जागावाटपाचा पेच संपला, ८० नाही, ९० नाही...; बावनकुळेंनी सांगितला नवा फॉर्म्युला
14
महाराष्ट्रासोबत दिल्लीतही मुदतपूर्व निवडणूक लागणार? आपची पहिली प्रतिक्रिया, काय आहेत नियम...
15
बँकांप्रमाणे LIC मध्येही होणार डिजिटल क्रांती; मोठ्या बदलासाठी Infosys कडे दिली जबाबदारी
16
PM मोदी गोंजारतायत ती अडीच फुटांची गाय कुठे मिळते? एक वेळ तर केवळ 100 च उरल्या होत्या; जाणून घ्या किंमत
17
"शिंदेजी, संजय गायकवाडला आवरा, नाहीतर...", नाना पटोलेंचा मुख्यमंत्र्यांना इशारा
18
'या' देशांमध्ये मिळतंय कवडीमोल भावात पेट्रोल; किंमत जाणून बसेल धक्का
19
राज्यात भाजपाला जमिनीचा कस लागेना? दिल्लीतून नेत्यांचे दौऱ्यांवर दौरे, काय चाललेय मनात...
20
टीम इंडियाला श्रीलंकेत रडवणाऱ्या Dunith Wellalage ला ICC कडून मिळाला खास सन्मान

Kidney Failure: मुत्रपिंड निकामी होत असल्यास शरीर देतं संकेत, 'या' रंगाची होते लघवी, वेळीच ओळखा धोका!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2022 3:50 PM

मूत्रपिंड निकामी होणं म्हणजेच किडनी फेल्युअरमध्ये (kidney failure) जाणवणाऱ्या लघवीचा रंग आणि त्याच्या सुरुवातीच्या इतर लक्षणांबद्दल जाणून घेऊया.

संपूर्ण जगभरात जागतिक मूत्रपिंड दिन (World Kidney Day 2022) साजरा होत आहे. लोकांना मूत्रपिंडाच्या (किडनी) आजारांपासून वाचवणं हा याचा उद्देश आहे. मूत्रपिंड निकामी झाल्यामुळं आपल्या लघवीचा रंग बदलतो. याशिवाय मूत्रपिंड निकामी होण्याची अनेक लक्षणं आहेत. मूत्रपिंड निकामी होणं म्हणजेच किडनी फेल्युअरमध्ये (kidney failure) जाणवणाऱ्या लघवीचा रंग आणि त्याच्या सुरुवातीच्या इतर लक्षणांबद्दल जाणून घेऊया.

मूत्रपिंडाच्या आजाराची सुरुवातीची लक्षणं (Early Signs of Kidney Disease)

झी न्यूज दिलेल्या बातमीनुसार, उच्च रक्तदाब, मधुमेह किंवा काही औषधांमुळं मूत्रपिंड निकामी होऊ शकतं. मूत्रपिंड निकामी झाल्याची लक्षणं आजार बराच वाढल्यानंतर दिसतात. मात्र, काही समस्या त्याची सुरुवातीची लक्षणं म्हणून दिसू शकतात.

  • लघवी कमी होणं
  • पाणी भरल्यानं सांधेदुखी
  • श्वास लागणं आदी.

किडनी फेल्युअरची लक्षणं (Kidney Failure Symptoms)

मूत्रपिंड निकामी झाल्यावर काही लक्षणं दिसतात. NIH च्या मते, मूत्रपिंड निकामी झाल्यामुळं खालील लक्षणं दिसून येतात. त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे महागात पडू शकते.

  • डोकेदुखी सुरू होणं
  • अंगावर खाज सुटणं
  • दिवसभर थकवा
  • रात्री झोपं न लागणं
  • वजन कमी होणं किंवा भूक न लागणे
  • शारीरिक कमजोरी
  • स्मरणशक्ती कमी होणं किंवा लक्ष केंद्रित करण्यास असमर्थता इ.
  • मूत्राचा रंग किडनीच्या आरोग्याविषयी (Urine Colour about kidney health) :
  • लघवीचा रंग काही प्रमाणात मूत्रपिंडाच्या आरोग्याबद्दल सूचित करू शकतो.
  • स्वच्छ किंवा फिकट पिवळा रंग - शरीरात पाण्याची पातळी योग्य असणं
  • गडद पिवळा रंग - शरीरात पाण्याची कमतरता म्हणजेच डिहायड्रेशन
  • केशरी रंग - शरीरात पाण्याची तीव्र कमतरता किंवा रक्तातील पित्ताचं लक्षण
  • गुलाबी किंवा लाल रंग - लघवीतील रक्तामुळे किंवा स्ट्रॉबेरी आणि बीटसारखे पदार्थ खाल्ल्यामुळं
  • लघवीत फेस दिसणं - लघवीतील प्रथिनांचं प्रमाण मूत्रपिंडाच्या आजाराचं लक्षण दर्शवतं. जसं की, लघवीत फेस दिसत असल्यास ते मूत्रपिंड निकामी होण्याचं लक्षण असू शकतं
टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स