Kidney Stone Diet Plan and Prevention: आजकाल भरपूर लोकांना किडनी स्टोनची समस्या होत आहे. किडनी आपल्या शरीराती महत्वाचे अवयव आहेत. ज्या रक्त फिल्टर करण्याचं काम करतात. ब्लड फिल्टरेशन दरम्यान रक्तातील सोडिअम, कॅल्शिअम आणि इतर मिनरल्सचे कण यूरिनल ब्लॅडरमधये पोहोचतात आणि लघवीसोबत शरीरातून बाहेर निघतात. जेव्हा रक्तात सोडिअम, कॅल्शिअम आणि इतर मिनरल्सचं प्रमाण खूप वाढतं तेव्हा ते किडनीमध्ये जमा होऊन छोट्या छोट्या स्टोनचं रूप घेतात आणि किडनी स्टोनची समस्या होते. अशात यूरिनला यूरिनल ब्लॅडरमध्ये पोहोचण्यास अडथळा होऊ लागतो आणि किडनी स्टोनची समस्या होते. अशात रूग्णांनी खाण्याची पिण्याची काळजी घेतली पाहिजे. आज आम्ही सांगणार आहोत की, किडनी स्टोन झाला तर काय खाणं टाळलं पाहिजे.
टोमॅटो
बियांच्या भाज्यांबाबत सांगायचं तर किडनी स्टोनची समस्या असलेल्या लोकांनी टोमॅटो खाणं टाळलं पाहिजे. कारण टोमॅटोमध्येही ऑक्सालेट आढळतं ज्याने स्टोनचा आकार मोठा होतो. कमी प्रमाणात टोमॅटोचं सेवन करता येऊ शकतं. कारण यात आढळणारं ऑक्सालेट हे कमी प्रमाणात असतं.
काकडी
किडनी स्टोनची समस्या असेल तर काकडी खाणंही नुकसानकारक ठरू शकतं. जास्त प्रमाणात काकडी खाल्ल्याने शरीरात पोटॅशिअमचं प्रमाण वाढतं. ज्यामुळे Hyperkalemia नावाचा एक आजार होण्याचा धोका असतो. जास्त काकडी खाल्ल्याने तुमच्या स्टोनचा आकारही वाढतो. तुम्हाला त्रास जास्त होऊ शकतो.
पालक
तुम्ही आधीच किडनी स्टोनच्या समस्येने हैराण असाल तर तुमच्यासाठी पालक खाणंही महागात पडू शकतं. कारण पालक खाल्ल्यानेही स्टोनचा आकार मोठा होतो. पालकमध्ये ऑक्सॅलिक अॅसिड असतं जे आपल्या शरीरात कॅल्शिअम ऑक्सालेट तयार करतं. यामुळे किडनीतील स्टोनचा आकार मोठा होऊ लागतो. तुम्हाला किडनी स्टोन असेल तर पालक खाणं टाळा.
वांगी
पालकाशिवाय वांग्यांमध्येही ऑक्सालेट आढळून येतं. याने किडनीतील स्टोनचा आकार वाढतो. अशात तुम्ही जर किडनी स्टोनच्या समस्येने हैराण असाल तर वांगी खाणं टाळलं पाहिजे. हेच कारण आहे की, डॉक्टरही किडनी स्टोनच्या रूग्णांना वांगी न खाण्याचा सल्ला देतात.
फास्ट फूड, तळलेले पदार्थ
जर तुम्हाला किडनी स्टोनची समस्या असेल तर तुम्ही जंक फूड, फास्ट फूड, तळलेले पदार्थ कमी खाल्ले पाहिजे. कारण यात सोडिअमचं प्रमाण जास्त असतं. त्याशिवाय मिठाचं अधिक प्रमाणात सेवन करणंही टाळलं पाहिजे. तसेच प्रोटीनचं सेवनही कमी करा. मांस-मासे खाणं टाळा. किडनी स्टोनची समस्या असेल तर व्हिटॅमिन सी युक्त पदार्थ, फळं खाणंही टाळलं पाहिजे.
काय खावे-प्यावे?
किडनी स्टोन झाला असेल तर दिवसभर भरपूर पाणी प्यावे. पाण्यामुळे स्टोन तयार करणारे केमिकल्स नष्ट होतात. तुळशीची पाने यूरिक अॅसिड स्थिर ठेवण्यास मदत करतात आणि किडनीमध्ये असलेल्या अॅसिटिक अॅसिड स्टोनला नष्ट करतात. रोज दोन चमचे तुळशीच्या पानांचा रस प्यायल्यास फायदा मिळेल.