वॉशिंग्टन : किडनीमधील मूतखडा फोडण्यासाठी लेझर किंवा अल्ट्रासाउंड लहरींचा वापर केला जातो ही गोष्ट आता नवी राहिलेली नाही. मात्र, बर्स्ट वेव्ह लिथोट्रीप्सी (बीडब्ल्यूएल) या ध्वनिलहरींच्या नव्या तंत्राद्वारे मूतखडा विकारावर अधिक प्रभावी उपचार करणे व त्या शस्त्रक्रियेचा खर्च कमी करणे शक्य होणार आहे.यासंदर्भातील संशोधनावर आधारित एक लेख दी जर्नल ऑफ युरॉलॉजी या नियतकालिकात प्रसिद्ध झाला आहे. वाॅशिंग्टन विद्यापीठाच्या स्कूल ऑफ मेडिसीन व कॉलेजेसचे एमडी जॉनथन हार्पर यांनी ही माहिती दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, नवीन बीडब्ल्यूएल तंत्राद्वारे किडनीमध्ये विविध जागी असलेले, वेगवेगळ्या आकाराचे मूतखडे फोडून त्यांचे दोन मिलिमीटरपेक्षा कमी आकारमानाचे तुकडे करण्यात आले. या प्रक्रियेत शरीरातील उतींना खूपच नगण्य दुखापत झाली. दहा मिनिटांत पाडले तुकडेवाॅशिंग्टन विद्यापीठाच्या स्कूल ऑफ मेडिसीन व कॉलेजेसचे एमडी जॉनाथन हार्पर यांनी सांगितले की, मोठ्या आकाराचे मूतखडे काढण्यासाठी युरेटेरोस्कोपी केली जाते. त्याआधी बीडब्ल्यूएल हे नवे तंत्र वापरून मोठ्या आकाराच्या मूतखड्यांचे अवघ्या दहा मिनिटांत बारीक तुकडे करण्यात यश आले.
ध्वनिलहरींच्या नव्या तंत्राने कमी खर्चात हाेऊ शकणार किडनी स्टोनची शस्त्रक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2022 9:45 AM