(Image Credit : MomJunction)
खरं तर मुलांना खाऊ-पिऊ घालणं आई-वडिलांसाठी फार अवघड काम असतं. अनेकदा मोठी माणसं जे करता त्याचचं अनुकरण मुलं करत असतात. मग ते वागण्या-बोलण्याच्या बाबतीत असो किंवा खाण्याच्या. त्यांना त्या सर्व गोष्टी करायच्या असतात, जे त्यांच्यासमोर वडिलधारी माणसं करत असतात. त्यामुळे अनेकदा मोठ्यामाणसांना चहा पिताना पाहून ते चहा पिण्याचा आग्रह धरतात. कधीकधी तर पालक स्वतःच मुलांना चहा पिण्यासाठी प्रवृत्त करतात. पण तुम्हाला माहीत आहे का? चहा पिणं मुलांच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरतं. मुलं दूध पिताना नाक-तोडं वाकडं करतात. त्यामुळे पालकचं त्यामध्ये थोडा चहा एकत्र करून त्यांना पिण्यासाठी सांगतात. तुम्हाला असं वाटत असेल की, त्यामुळे मुलांच्या शरीराला त्या दूधाचा संपूर्ण लाभ मिळेल. पण हा तुमचा गैरसमज आहे. द हेल्थ साइटने दिलेल्या वृत्तानुसार, लहान मुलांच्या आरोग्यासाठी दूध पिणं अत्यंत हानिकारक असतं.
स्मरणशक्ती आणि मेंदूवर विपरित परिणाम
तुमचं मुलं खूप चहा पित असेल तर त्याचा थेट परिणाम मेंदू, स्नायू आणि नर्वस सिस्टिमवरही होतो. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात चहा प्यायल्याने शरीराच्या विकासामध्ये अडथळा निर्माण होतो. त्यामुळे वाढत्या वयाच्या मुलांना शक्यतो चहा पिण्यास देणं टाळावं. याशिवाय चहाचे जास्त सेवन केल्यामुळे त्यांच्या स्मरणशक्तीवरही परिणाम होतो. हाडं कमकुवत होतात
लहान वयापासून चहा प्यायल्याने हाडांवर विपरित परिणाम होतो. हाडं कमकुवत होतात. त्यामुळे शरीराला कॅल्शिअम व्यवस्थित मिळत नाही. हाडांच्या समस्या, दात ठिसूळ होणं आणि हिरड्या दुखणं यांसारख्या आजारांचा सामना करावा लागतो. त्यामुळे मुलांना लहानपणापासूनच दूध पिण्याची सवय लावा. त्यामुळे शरीरातील कॅल्शिअमची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत होते.
झोप येण्यासाठी त्रास
मुलांना चहा पिण्यास दिल्यामुळे त्यांना झोपेसंदर्भातील अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. त्यांना झोप येण्यात अडथळा निर्माण होतो. कारण यामध्ये असलेलं कॅफेन मुलांमध्ये अस्वस्थता आणि झोपेसंबंधी आजारांची समस्या वाढवू शकते. यामुळे मुलांची एकाग्रता आणि सक्रियतेवर परिणाम होतो.