चुंबन घेणे ही गोष्ट केवळ प्रेम, काळजी व्यक्त करण्याचं एक माध्यमच नाही तर याने आरोग्यालाही अनेक फायदे होतात. पण चुंबन घेण्याचे काही नुकसानही आहेत, असं एका रिसर्चमधून समोर आलं आहे. चुंबन घेतल्याने गॉनोरिया नावाचा आजार पसरतो. गॉनोरिया हा एक संसर्गजन्य आहे. या आजारात Neisseria gonorrhoeae नावाचा एक व्हायरस पसरतो. हा आजार महिला आणि पुरूषांच्या प्रजनन मार्गाच्या माध्यमातून किंवा शारीरिक संबंधावेळी पसरतो. तसेच हा आजार मूत्रमार्ग, गुदा आणि घशालाही प्रभावित करतो.
(Image Credit : Healthline)
द लान्सेट नावाच्या जर्नलमध्ये प्रकाशित या रिसर्चमध्ये ३६०० अशा पुरूषांवर अभ्यास करण्यात आला, ज्यांनी मार्च २०१६ पासून १२ महिन्यांच्या कालावधीत महिला आणि पुरूषांसोबत लैंगिक संबंध ठेवले. गे किंवा बायसेक्शुअल लोकांच्या घशात गॉनोरिया इन्फेक्शन होण्याचा धोका अधिक असतो. या रिसर्चमध्ये सहभागी लोक हे गे किंवा बायसेक्शुअल होते. यात हे आढळलं की, त्या लोकांना गॉनोरियाचा धोका जास्त होता, जे पार्टनरचं केवळ चुंबन घेतात. तर चुंबन घेण्यासोबतच शारीरिक संबंध ठेवणाऱ्यांना या आजाराचा धोका अधिक बघायला मिळाला. केवळ शारीरिक संबंध ठेवणाऱ्यांमध्ये या आजाराचा धोका अजिबात नाही.
गॉनोरियाची लक्षणे
लघवी करताना जळजळ होणे आणि गुप्तांगात वेदना होणे.
जर गॉनोरियाचा प्रभाव डोळ्यांपर्यंत पोहोचला असेल तर डोळ्यातून पस निघू लागेल.
महिलांच्या प्रायव्हेट पार्टमधून अधिक डिस्चार्ज होऊ लागेल.
पुरूषांच्या गुप्तांगावर सूज येऊ शकते.
गॉनोरियाची कारणे आणि उपाय
गॉनोरिया आजार होण्याला वेगवेगळी कारणे आहेत. जसे की, असुरक्षित शारीरिक संबंध ठेवणे, एकापेक्षा अधिक लोकांसोबत शारीरिक संबंध किंवा संक्रमण झालेल्या व्यक्तीशी शारीरिक संबंध ठेवणे. जर वेळीच गॉनोरियावप उपचार केले गेले नाही तर याने बाळ न होण्याची समस्या आणि एचआयव्ही किंवा एड्स होण्याचाही धोका असतो. त्यामुळे शारीरिक संबंध ठेवताना कंडोमचा वापर करावा. एकापेक्षा जास्त व्यक्तींसोबत संबंध ठेवू नये.