(Image credit- cannon hygiene international)
सध्याच्या काळात फिटनेस मेंटेन करण्यासाठी आणि वाढलेलं वजन कमी करण्यासाठी अनेक लोक जिमला जात असतात. पण जिमला जाणारे लोक आजारांपासून लांब असतात. असं नाही, आज आम्ही तुम्हाला जीमला जात असलेल्या लोकांना कोणत्या प्रकारच्या आजारांचा धोका असतो. याबद्दल सांगणार आहोत.
जिमला जात असल्यामुळे वजन कमी होऊन शरीर चांगले राहते. पण तुम्हाला माहीत आहे का जिमला जाण्यामुळे अनेक विषाणू आणि बॅक्टेरीया शरीरावर वाढण्याचा धोका असतो. सध्याच्या काळात एक रिसर्च करण्यात आला. त्यानुसार जिमला जात असलेले सर्वाधीक लोक स्वतःच्या शरीराची काळजी घेण्याबाबत निष्काळजीपणा करतात. त्यामुळे लोक किटाणूंच्या संपर्कात येण्याचा धोका वाढतो.
या सर्वेमध्ये असं दिसून आले की जिमला जात असलेले अर्ध्यापेक्षा जास्त लोक बाथरूमचा वापर केल्यानंतर हात धूत नाहीत. तसेच हात जिम एक्वीप्मेंट्सला हात लावत असतात. ३५ टक्के लोक वेट मशीनचा वापर करण्याआधी साफ करत नाहीत. २५ टक्के महिलांना मान्य केले की त्या कार्डीओ मशिनचा वापर करण्याआधी मशीन स्वच्छ न करताच वर्कआऊट करतात. अशा निष्काळजीपणामुळे त्वचेचे आजार होण्याचा धोका असतो.
फंगल इंफेक्शन (Fungal Infections) :
फंगल इन्फेक्शन होण्याची समस्या खूपच कॉमन झाली आहे. ही समस्या जीमला जात असलेल्या लोकांना जास्त होत असते. यामुळेच एथलिट फूट आणि जॉक इच होण्याची समस्या वाढत जाते. शरीराचा जो भाग ओला राहतो. त्या भागावर हे इन्फेक्शन पसरत जाते. सर्वसाधारणपणे जिमचे लॉकर आणि चेजिंग रूमचा वापर चुकीच्या पध्दतीने केल्यानंतर हा आजार होण्याचा धोका अधिक असतो. त्यासाठी उपाय म्हणून जिममधून घरी आल्यानंतर अंघोळ करा आणि व्यायाम करताना वापरलेले कपडे धुण्यासाठी द्या. ( हे पण वाचा-गुलाबाच्या चहाने झटपट वजन करा कमी, ना डाएटची कटकट ना व्यायामाची झंझट!)
व्हायरस (Viruses) :
जिमला जात असलेल्या लोकांना घाम खूप येत असल्यामुळे शरीराच्या आतील काही भागात एचपीवी (Human Papilloma Virus) पसरण्याचा धोका असतो. हा व्हायरस एका व्यक्तीकडून इतर व्यक्तीकडे पसरत जातो. श्वासांच्या माध्यमातून हा आजार पसरत जातो.
एक्सपर्टसच्यामते जिमला जाण्याचे फायदे आहेत तसचं नुकसान सुद्धा आहे. त्यासाठी इन्फेक्शन होऊ नये. म्हणून तुम्ही जिमला जाणं बंद करणं हा योग्य पर्याय नाही. त्यासाठी काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. परिणामी किटाणूंपासून तुम्हाला स्वतःच्या शरीराला दूर ठेवता येईल.
हातांच्या स्वच्छतेकडे लक्ष द्या. जिममध्ये इक्वीप्मेंट्सचा वापर केल्यानंतर हात साबणाने स्वच्छ धुवा.
वर्कआऊट करताना घाम आल्यानंतर घाम पुसण्यासाठी असलेला नॅपकिन तोंडाला लावू नका.
एंटी-बॅक्टेरियल वाइप्स आणि स्प्रे चा वापर करा.
वर्कआऊट केल्यानंतर अंघोळ करण्यासाठी आळस करू नका. ( हे पण वाचा-'ही' टॅबलेट नेहमी घेत असाल तर कंबर मोडण्याचा वाढेल धोका, वेळीच व्हा सावध!)