तुम्ही रोज तासनतास कॉम्प्युटरवर नजर लावून काम करत असाल तर कधीकधी डोळ्यांमध्ये जळजळ होते. तर कधी धुसर दिसायला लागतं. थकवा येतो, तसंच खांदे दुखतात असा त्रास जर तुम्हालाही होत असेल तर वेळीच सावध व्हा. कारण ही लक्षणं कॉम्प्युटर व्हिजन सिंड्रोमची असू शकतात. तसंच ही समस्या अशा लोकांमध्ये सर्वाधिक दिसून येते जे लोक पीसी समोर बसून जास्त वेळ काम करतात.
जेव्हा तुम्ही बराचवेळ पीसी समोर बसून काम करत असता तेव्हा स्क्रीनवर तुमचा फोकस असतो. तसंच अनेक वेगवेगळे शब्द आपण वाचत असतो. त्यांचा नकळतपणे तुमच्या डोळ्यांवर परीणाम होत असतो. या प्रक्रियेच डोळ्यांच्या मासंपेशींवर नकारात्मक परिणान घडून येत असतो. स्क्रीनमुळे डोळ्यांवर येणारा उजेड दबाव निर्माण करत असतो. यांमुळे कॉम्प्युटर व्हिजन सिंड्रोम हा आजार उद्भवू शकतो. जेव्हा आपण तासनतास कोणतेही पुस्तक वाचत असतो तेव्हा डोळ्यांवर पडणारा ताण हा स्क्रीनसमोर काम करत असताना येणाऱ्या ताणापेक्षा तुलनेने कमी असतो.
जेव्हा कॉम्प्युटर व्हिजन सिड्रोंम हा आजार होतो. त्यावेळी डोळे लाल होणे, डोळ्यांमधून धुसर दिसणे, डोळ्यांच्या आत खाज येणे, डोकेदुखी, पाठदुखी, किंवा कंबरदुखीचा सामना करावा लागू शकतो. जर तुम्हाला व्हिजन सिन्ड्रोम होण्यापासून स्वतःचा बचाव करायचा असेल तर तुम्ही काही गोष्टींची काळची घेणं आवश्यक आहे.
आपल्या कॉम्प्युटरच्या स्क्रीनला स्वतःपासून २० ते २६ इंचांपर्यंत दूर ठेवा. स्क्रिनचा ब्राइटनेस अडजस्ट करा. कोणत्याही लाईट्सचे रिफ्लेक्शन स्क्रीनवर येऊ देऊ नका. काम करत असतान पापण्यांची हालचाल सुद्दा महत्त्वाची आहे. कारण कॉम्प्युटरवर काम करत असताना आपण खूप कमीवेळा पापण्यांची हालचाल करतो. स्क्रीनकडे बराचवेळ एकटक पाहिल्यामुळे हा आजार होण्याची शक्यता जास्त असते. शक्य असल्यास बसल्या बसल्या ५ मिनिटं वेळ काढून शरीराची हालचाल करा.