(Image Credit : skincancer.or)
स्किन कॅन्सर म्हणजचे त्वचेचा कर्करोग झाल्याचं लोकांमध्ये सुरूवातीलाच कळून येत नाही. याचं मोठं कारण म्हणजे योग्य माहितीचा अभाव. जेव्हा जास्तीत जास्त लोकांना ते या आजाराचे शिकार झाल्याचं कळतं तेव्हा फार उशीर झालेला असतो. अशात गरजेचं आहे की, लोकांना स्किन कॅन्सरबाबत माहिती असावी.
का होतो स्किन कॅन्सर?
सामान्यपणे स्किन कॅन्सर उन्हात फार जास्त एक्सपोजर खासकरून अल्ट्राव्हायलट रेजदरम्यान उन्हात बाहेर राहिल्याने होतं. तेच काही लोकांमध्ये त्यांच्या ब्युटी ट्रीटमेंट दरम्यानही हा आजार होऊ शकतो. यात जास्तीत जास्त केसेसमध्ये आर्टिफिशिअल टॅनिंग मशीनचा वापर होतो. तेच खराब क्वालिटीच्या ब्युटी प्रॉडक्ट्समुळेही स्किन कॅन्सरचा धोका उद्भवतो.
काय सांगतो रिसर्च?
सामान्यपणे स्किन कॅन्सर त्या लोकांमध्ये अधिक बघायला मिळतो, ज्यांचा स्किन कलर हा फार फेअर असतो. किंवा त्यांच्या परिवारात कुणाला स्किन कॅन्सरचा इतिहास असेल तर. तसेच त्वचा जळणे हेही याचं एक कारण असू शकतं. जुलै महिन्यात ऑस्ट्रेलियातील वैज्ञानिकांनी त्यांच्या एका शोधाच्या आधारावर सांगितले की, परजीवी संक्रमण रोखण्यासाठी जवळपास चार दशकांपासून वापरलं जाणारं एक औषध उंदरांमध्ये 'मेलानोमा' सोबत लढण्यास मदत करत आहे. मेलानोमा स्किन कॅन्सरचा सर्वात घातक प्रकार आहे.
बेरियाट्रीक सर्जरी फायदेशीर
जे रूग्ण बेरियाट्रीक सर्जरी करतात, त्यांच्यात स्किन कॅन्सर आणि मेलानोमा होण्याचा धोका कमी असतो. आणि याने स्किन कॅन्सर होण्याची शक्यताही नष्ट केली जाते असे बोलले जाते. स्किन कॅन्सरा धोका कमी असण्याचा आधार बॉडी मास इंडेक्स किंवा वजन सर्जरीनंतर कमी होणं हा नाहीये. सामान्यपणे स्किन कॅन्सर त्वचेत होणाऱ्या काही प्रतिक्रियांमुळे होतो. अशात बेरियाट्रीक सर्जरीनंतर लठ्ठपणासोबतच मेलेनोमा कमी होतो, ज्यामुळे स्किन कॅन्सरचा धोका कमी होतो.
स्किन कॅन्सरची लक्षणे
स्किन कॅन्सरच्या मुख्य लक्षणांमध्ये रूग्णाला पुन्हा पुन्ह त्वचेसंबंधी एग्जिमासारखे आजार होणे, गाल, मान, फोरहेड आणि डोळ्यांच्या स्किनच्या आजूबाजूला जळजळ होणे, इचिंग होणे आणि स्किन सतत लाल राहणे यांचा समावेश आहे. यासोबतच जर रूग्णाच्या शरीरावर एखादा बर्थ मार्क असेल तर त्याचा रंग वेगाने बदलणे. कधी-कधी स्किनवर अनेक प्रकारचे डाग होत असतीलल आणि अनेक आठवडे राहत असतील.