दरवर्षी आठ मे ला जागतीक थॅलेसेमिया डे साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्यामागे रक्ताशी संबंधीत आजार थॅलेसिमीयाबाबत जनजागृती करणं हा उद्देश आहे. थॅलेसेमिया हा अनुवांशिक आजार आहे. जो मोठ्या माणसांपासून लहान मुलांमध्ये पसरतो. आज आम्ही तुम्हाला थॅलेसेमिया या आजाराबाबत माहिती देताना बचावाचे उपाय सुद्धा सांगणार आहोत.
थॅलेसेमिया एक रक्तासंबंधी आजार असून हा आजार अनुवांशिक आहे. एका निरोगी व्यक्तीच्या शरीरातील आरबीसी म्हणजे लाल रक्ताच्या पेशींची संख्या ४० ते ४५ लाख प्रति घन मिलीमीटर असते. थॅलेसेमिया या आजारात आरबीसी नष्ट व्हायला सुरुवात होते. त्यामुळे नवीन पेशी तयार होण्याची प्रक्रीया पूर्णपणे थांबते. साधारणपणे लाल पेशींचे जीवनमान १२० दिवसांचे असते. या आजारात लालपेशी जीवंत राहण्याची क्षमता कमी होऊन १० ते २५ दिवसांची होते. त्यामुळे शरीरात रक्ताची कमतरता भासते.
थॅलेसिमीयाची लक्षणं
लहान मुलांच्या नखांमध्ये आणि जीभेवर पिवळटपणा
मुलांची वाढ व्यवस्थित न होणं
वजन न वाढणं, अशक्तपणा वाटणं
श्वास घ्यायला त्रास होणं
पोटाला सूज येणं
लघवीला त्रास होणं
उपाय
हा आजार पसरू नये यासाठी लग्नाआधी तरूण तरूणीने रक्ताची तपासणी करायला हवी, दोघेही थॅलेसेमिया वाहक असल्यास लग्न करणं टाळावे. पती-पत्नीपैकी एकही थॅलेसेमियाग्रस्त असल्यास मुलाला आजार संभावतो, ते टाळण्यासाठी पुरेशी काळजी घ्यावी.
या आजारापासून वाचण्यासाठी पोषक आहार घ्यायला हवा. आहार प्रोटिन्स आणि कॅल्शियमयुक्त पदार्थांचा समावेश असावा. रोज व्यायाम किंवा योगा करणं गरचेचं आहे. बिटा थॅलेसेमिया व्याधीग्रस्तांना जगण्यासाठी नियमित रक्त देण्याची गरज असते. दर ४ ते ६ आठवडय़ांनी त्यांना रक्त मिळायलाच हवे.
(हे पण वाचा-लॉकडाऊनमध्ये लठ्ठपणाचे शिकार होण्यापेक्षा मेंटेन राहण्यासाठी रोज 'या' गोष्टींकडे लक्ष द्या)
थॅलेसिमीया या आजारापासून बचावासाठी वेळोवेळी रक्त तपासणी करणं गरजेंच आहे. याशिवाय बाळाचा जन्म झाल्यानंतरही थॅलेसिमीयाची टेस्ट करायला हवी. थॅलेसिमीयानेग्रस्त असलेल्या व्यक्तीने व्हिटामीन्स, आयर्नचा आहारात समावेश करायला हवा. गंभीर परिस्थितीत रक्त बदलण्याची गरज भासू शकते.
अनेकदा या आजारात पित्ताशयाची पिशवी काढल्यानंतर सर्जरी करावी लागते. काविळसारखे आजार होऊ नयेत म्हणून काळजी घेण्याची गरज असते. व्याधीमुक्त होण्यासाठी मुलांचे बोन मॅरो ट्रान्सप्लांट हा उपाय आहे. यांसंबंधी मुलांना शारीरिक त्रास झाल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. (हे पण वाचा-फुफ्फुसांमध्ये जमा झालेली घाण स्वच्छ करण्यासाठी 'या' ४ पदार्थांचा करा वापर)