ऑलिव्ह ऑईल हृद्यासाठी नेहमी लाभदायक समजलं जातं. अमेरिकेतील रिसर्चनुसार अर्धा चमचा ऑलिव्ह ऑईल शरीराला स्वास्थ ठेवण्यासाठी उत्तम असतं. हा रिसर्च अमेरिकेतील लोकसंख्येवर करण्यात आला होता. तीस वर्षांतील आकडेवारीवर परिक्षण करण्यात आलं होतं. त्यात असं दिसून आलं की हे तेल अर्ध्या चमचा हे तेल खाल्याने हार्ट अटॅक येण्याची शक्यता २० टक्के कमी होते. मेडिटेरियन डाईटमध्ये ऑलिव्ह ऑईलचा समावेश होतो.
ऑलिव्ह ऑईल हृदयाचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी महत्वाचं समजलं जातं. रोज अर्धा चमचा ऑलिव्ह ऑईल खाल्ल्याने हृदय रोगाची जोखीम १५ टक्क्यांनी कमी होते. तसंच कोरोनरी हार्ट डिसीजचा धोका २१ टक्क्यांनी कमी होतो. अनेक वर्षांपासून हृदयाशी संबंधीत औषधांमध्ये ऑलिव्ह ऑईलचा वापर केला जातो. या तेलाचा वापर तुम्ही तळण्यासाठी किंवा भाजण्यासाठी करू शकत नाही. याचा वापर सलाड किंवा मंद आचेवरील जेवणात केला जातो. तज्ञांच्यामते ऑलिव्ह ऑईल ओमेगा ३ फॅटी एसिड्सचे प्रमुख स्त्रोत आहेत. त्यासोबतच अनहेल्दी, ट्रांन्स फॅटी एसिड्सना चांगल्या फॅट्समध्ये बदलण्याचा एक सरळ मार्ग आहे.
या तेलाच्या वापरामुळे सुज कमी होते आणि कॉलेस्ट्रॉलमध्ये सुधारणा घडून येते. ऑलिव्ह ऑईलमध्ये मोनोसॅच्युरेटेड फॅट आढळतं जे तुमचं चांगलं कॉलेस्ट्रॉल आणि एचडीएल राहण्यास मदत करतं. त्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो.
जर तुम्हाला पोट साफ न होण्याती समस्या जाणवत असेल तर दिवसातून दोनदा एक चमचा एक्स्ट्रा व्हर्जिन ऑलिव्ह ऑईल रिकाम्या पोटी घेतल्यास बद्धकोष्ठतेची समस्या दूर होईल. पण या तेलाचं सेवन करण्याआधी तुम्ही चार तास काहीही खाऊ नका.
रोजच्या जेवणात ऑलिव्ह ऑईलचा समावेश केल्यास तुमची ब्लड शुगर लेव्हल नियंत्रणात राहते. ऑलिव्ह ऑईल हे फॅट्सविरोधी असल्याने भविष्यात तुमचं डायबेटीसही नियंत्रणात राहण्यास मदत होते.
हेल्दी फॅट देणारं ऑलिव्ह ऑईल हे एक सुपर फूड आहे, एका रिसर्चनुसार, जर तुम्ही रोज ऑलिव्ह ऑईलचं सेवन केल्यास तुमचं वजन कमी होण्यास मदत होते आणि आरोग्यही चांगलं राहतं.
ऑलिव्ह ऑईलचं नियमित सेवन केल्यास तुमचं एकूणच मानसिक आणि शारिरीक आरोग्य चांगलं राहण्यास मदत होते. ऑलिव्ह ऑईल तुमच्या मेंदूतील सेरोटोनिनची पातळी वाढवतं