आंघोळ करणं हे आपल्या दिनचर्येतील महत्वाचं काम आहे. आरोग्य चांगलं ठेवण्यासाठीही ही महत्वाची बाब आहे. हे तर तुम्हाला माहीत आहेच की, आंघोळ केल्याचे अनेक असतात. पण यासोबतच हेही महत्वाचं आहे की, कोणत्या वेळेला आंघोळ करणं योग्य असतं. दिवसा कधीही आंघोळ करू शकता. पण असं करणं आरोग्यासाठी चांगलं नसतं. जर तुम्ही योग्य वेळी आंघोळ केली तर आरोग्याला जास्त फायदा होईल. सोबतच काही वेळा अशाही असतात जेव्हा तुम्ही आंघोळ करणं योग्य नसतं.
कोणत्या वेळी आंघोळ करावी?
तुम्हाला हे वाचून जरा विचित्र वाटेल, पण हे सत्य आहे की, सकाळऐवजी सायंकाळी आंघोळ करणं जास्त फायदेशीर असतं. अनेक रिपोर्ट्सनुसार, जर तुम्ही रात्री आंघोळ करत असाल तर तुम्ही योग्य तेच करत आहात. रात्री आंघोळ करणं तुमच्या त्वचेसाठी बरंच फायदेशीर असतं. खासकरून उन्हाळ्यात आणि पावसाच्या दिवसात असं करणं जास्त फायदेशीर ठरतं. (हे पण वाचा : काय आहे Havana Syndrome, ज्यामुळे भारताची चर्चा जगभरात होत आहे?)
दिवसभर बाहेर राहिल्याने संपूर्ण दिवसभर तुमच्या स्कीनवर धूळ-माती, घाम चिकटतो. आणि यामुळे होणाऱ्या आजारांपासून वाचण्यासाठी सायंकाळी आंघोळ करणं चांगली सवय असते. त्यामुळे झोपण्यापूर्वी शरीर चांगल्या प्रकारे स्वच्छ करणं आवश्यक आहे. पण याचा अर्थ असा नाही की, सकाळी आंघोळ करणं चुकीचं आहे.
सायंकाळी आंघोळ करण्याचे फायदे?
सायंकाळी आंघोळ केल्याने तुमचं ब्लड प्रेशर नियंत्रित ठेवण्यास मदत मिळते. गरमीमुळे शरीराचं तापमान वाढल्याने रात्री आंघोळ करणं ब्लड प्रेशर नियंत्रित ठेवतं. सोबतच याने गाढ झोप येण्यासही मदत मिळते. तुमचा स्ट्रेसही याने कमी होतो. तसेच मेंदू, त्वचा, शरीराला बरेच फायदे मिळतात. अशात रात्री आंघोळ करणं अनेक दृष्टीने फायदेशीर ठरतं.
कधी आंघोळ करू नये?
आयुर्वेदानुसार आंघोळ करण्याबाबत अनेक नियम आहेत. असं म्हटलं जातं की, जर तुम्ही जेवण केल्यावर लगेच आंघोळ करत असाल तर ही एक चुकीची सवय आहे. आयुर्वेदानुसार, जेवण केल्यावर काही वेळाने म्हणजे १ ते २ तासांनी आंघोळ करावी. त्यासोबतच दिवसातीलही काही वेळा अशा असतात जेव्हा आंघोळ करू नये. झोपण्याच्या काही वेळेआधी आंघोळ करू नये आणि जर तुम्हाला जास्त वेळ शॉवर घेण्याची सवय असेल तर असं अजिबात करू नये. झोप आणि आंघोळीत अंतर असलं पाहिजे.