धावपळीचं जीवन आणि बदलेली जीवनशैली यांमुळे आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो. नकळतपणे लहान- मोठ्या समस्यांकडे दुर्लक्ष केल्याने याचं रुपांतर मोठ्या आजारांमध्ये होतं. अनियमीत आहार आणि जंक फुडचं अतिसेवन यांमुळे रोगप्रतिकारकशक्ती कमी होते. लिव्हरशी निगडीत आजार होण्याची शक्यता असते. त्यात टाइप २ डायबिटीस, टाइप २ फॅटी लिव्हर होण्याचा धोका जास्त असतो. काहीवेळा लिव्हरमध्ये सूज येत असते. आज आम्ही तुम्हाला या आजारापासून बचावाचे उपाय सांगणार आहोत.
फॅटी लिव्हर म्हणजे काय
यकृत अन्नपदार्थ पचवण्यासाठी मदत करते आणि संपूर्ण शरीराला ऊर्जा देण्याचं महत्त्वपूर्ण कार्य करतं. पण एखाद्या व्यक्तीच्या यकृतामध्ये प्रमाणापेक्षा अधिक चरबी निर्माण झाल्यास या समस्येस फॅटी लिव्हर असं म्हटलं जातं. डायबिटीस असलेल्या रुग्णांना हा आजार होण्याचा धोका अधिक असतो.
फॅटी लिव्हरची कारणं
वजन कमी होणं
वजन वाढल्यानंतर कमी करण्यासाठी लोक वेगवेगळे उपाय करत असतात. अनेकदा चुकीच्या मार्गाचा अवलंब केल्यामुळे आरोग्याचं नुकसान होतं. अन्नाचं पचन करण्यासाठी लिव्हरचं कार्य सुरळीत असणं गरजेचं असतं. योग्य प्रमाणात आहार शरीराला मिळाला नाही तर पचनक्रियेवर परिणाम होतो. परिणामी फॅटी लिव्हरची समस्या निर्माण होते.
तेलकट, खारट पदार्थ
तळलेल्या पदार्थांचं जास्त प्रमाणात सेवन होत असल्यास लिव्हरच्या समस्या वाढण्याची भीती जास्त असते. तळलेल्या पदार्थांमध्ये भरपूर प्रमाणात फॅट्स असतात. मिठाचा वापर कमीत कमी प्रमाणात केल्यास आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. मिठामुळे उच्च रक्तदाब किंवा कोलेस्ट्रॉल वाढणे यांसारख्या समस्या उद्भवतात. तसंच मादक पदार्थांचे सेवन फॅटी लिव्हर असणाऱ्यांसाठी अतिशय धोकादायक आहे.
फॅटी लिव्हरच्या समस्येवर उपाय
अक्रोड
अक्रोडात अँटीऑक्सिडेंट गुणधर्म आहेत. महत्त्वाचे म्हणजे यामध्ये कॅलरीचं प्रमाण अत्यंत कमी आहे. तज्ज्ञांच्या माहितीनुसार,फॅटी लिव्हर असणाऱ्यांनी आहारात कमी कॅलरीयुक्त पदार्थांचा समावेश करावा.
एपल व्हिनेगर
एपल व्हिनेगरमुळे पचनक्रिया चांगली राहते. शरीरातील विषारी घटक कमी करण्यासाठी एपल व्हिनेगर फायदेशीर असतं. त्यात अनेक एंटी-ऑक्सिडटंस असतात. त्यामुळे फॅटी लिव्हरच्या समस्येपासून बचाव केला जाऊ शकतो. ( हे पण वाचा-कोरोनापासून बचावासाठी फक्त ग्लोव्हज मास्क नाही तर आहारातील 'हे' पदार्थ ठरतील इफेक्टीव्ह)
कॉफी
कॉफीमध्ये असलेल्या तत्त्वांमुळे मधुमेह आणि वजन वाढण्याच्या समस्या कमी होण्यास मदत होते. फॅटी लिव्हरचा त्रासदेखील कॉफी बऱ्याच प्रमाणात कमी करते. तरीही कॉफीचे सेवन मर्यादित प्रमाणातच करणे आवश्यक आहे. ( हे पण वाचा-CoronaVirus : डोळ्यांच्या वेदना ठरू शकतात कोरोनाच्या इन्फेक्शचं मोठं कारण, जाणून घ्या रिसर्च)