श्वास घेताना छातीत दुखत असेल तर तुम्हाला असं वाटू शकतं हृद्यासंबंधी आजारामुळे असा त्रास होत आहे. पण अन्य काही कारणांमुळे सुद्धा छातीत दुखण्याचा त्रास होऊ शकतो. घाबरून जाण्याचं काही कारण नाही. आज आम्ही तुम्हाला छातीत दुखवण्याची काही वेगळी कारणं सांगणार आहोत. सध्या कोरोना व्हायरस आणि इतर झपाट्याने पसरत असलेल्या आजारांमुळे लोकांना आजारी पडलं तरी भीती वाटते.
अनेकदा बॅक्टेरिअल इंफेक्शन, लिव्हरसंबंधी आजार त्यामुळे स्प्लीन वाढतं. स्प्लीन डॅमेज झाल्यामुळे रक्तस्त्राव सुद्धा होऊ शकतो. पोटात आतल्या भागात सुज आल्यामुळे मसल्सना वेदना होतात. पोटात जळजळ होणं, पोट फुगणं यांसारखे आजार होतात.
किडनीमध्ये अनेक विषारी पदार्थ जमा झाल्यामुळे त्यांना बाहेर काढण्यासाठी योग्य प्रमाणात पाणी उपलब्ध झालं नाही तर किडनीस्टोन सुद्धा होऊ शकतो. त्यामुळे पोटाच्या बाजूला दुखायला सुरूवात होते. त्यामुळे जास्तवेळपर्यंत लघवी रोखून धरणं या दुखण्याला कारणीभूत ठरू शकतं.
प्लुरिसी या आजारात फुप्फुसांना सुज येते. कारण बॅक्टेरिअल आणि फंगल इन्फेक्शच झालेलं असू शकतं. त्यामुळे फुप्पुसांमधून पस बाहेर येणे, श्वास घ्यायला त्रास होणं असा त्रास होतो.
कार्टिलेजमधील सूज जेव्हा जास्त प्रमाणात होते. तेव्हा या स्थितीला कॉस्टोकोंड्राइटीस असं म्हणतात. ज्या प्रकारात मोठा श्वास घेतल्यानंतर पोटात दुखायला सुरूवात होते. शिंकताना खोकताना सुद्धा हीच समस्या जाणवते. जखम होण्याची सुद्धा शक्यता असते. पॅक्रियाटाइटिस या आजारात अनेकदा सूज आल्यामुळे डायरिया, उलटी अशा समस्या उद्भवतात. ज्यामुळे डाव्या बाजुला दुखत असतं. डॉक्टरांशी संपर्क करणं गरजेचं आहे.