आपला मेंदू आणि शरीर यांचा घनिष्ट संबंध असतो. आपण जसं वागतो, जसा विचार करत असतो त्याचा परिणाम आपल्या शरीरावर होत असतो. फिनलँड या ठिकाणी झालेल्या रीसर्चनुसार जवळपास ७०० लोकांवर वेगवेगळे प्रयोग करण्यात आले. ज्यात माणसाच्या भावनांचा शरीरातील वेगवेगळ्या भागांवर, अवयवांवर काय परीणाम होतो. याचे परीक्षण करण्यात आले. चला तर मग जाणून घेऊया आनंद, दुःख, भीती, या भावनांचा शरीरातील अवयवांवर कसा परीणाम घडून येतो.
(Image credit- communique)
बदलत्या जीवनशैलीतील वाढता ताण-तणाव, चिंता-विकार (ॲन्क्झायटी) हेही हृदयावर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष घातक परिणाम करतात. प्रगत देशांत पन्नास टक्के मृत्यू हृदयविकाराने होतात आणि यातल्या अनेक मृत्यूंना मानसिक विकार हातभार लावतात. जास्त राग आल्याचा परीणाम शरीरातील अंतर्गत अवयवांवर होतो.
डोकेदुखी, हायपरटेंन्शन यांसारखे आजार उद्भवतात. आरोग्य आणि नकारात्मकता याचा खूप जवळचा संबध आहे. नकारात्मक विचार तुमच्या शरीरातले होर्मोन्स चा समतोल बिघडवतात. आपले विचार जर सकारात्मक असतील तर स्ट्रेस कमी होण्यास मदत होते, चांगली झोप लागण्यास मदत होते.
(Image credit-Fat guy media)
जर जास्त वेळ लहान मुलं एखाद्या गोष्टीला घाबरत असतील. तर त्यांना आणि पोटाशी संबंधी आजार होण्याची धोका असतो. तसेच आनंदी राहिल्याने हृद्य उत्तम राहत. नकारात्मक गोष्टींना दुर्लक्ष करायला शिकून सकारात्मक गोष्टींकडे मन वळवल्याने तुमच्या आयुष्यावर चांगला परिणाम झालेला दिसेल.
काहीवेळा भोवतालच्या परिस्थीमुळे ताण येऊ शकतो. कामच्या व्यापात, जबाबदाऱ्या सांभाळायच्या नादात तुमचं स्वतःकडे दुर्लक्ष होऊ शकत. साहजिकच त्याचा परिणाम तुमच्या दैनंदिन कामावर आणि जगण्यावर होऊ शकतो. अशी परीस्थीती टाळण्यसाठी पोषक आहार घ्या. वेळेवर आणि व्यवस्थित झोप घेतल्याने ताण- तणाव जाणवणार नाही. त्याचप्रमाणे कशीही परीस्थिीती असल्यास आनंदी रहा. जेणेकरून आरोग्यावर वाईट परिणाम होणार नाही.