(Image Credit : Social Media)
आपण प्रवास करताना अनेकदा बघतो की, आजूबाजूच्या वेगवेगळ्या भिंतींवर, बसेसमध्ये, रिक्षांवर, रेल्वेत १०० टक्के पाइल्स बरा करण्याचा दावा करणाऱ्या जाहिराती दिसतात. अनेकजण याला बळी पडतात आणि नको नको ते उपचार घेतात. आता या सडकछाप उपचारांनी आजार दूर होण्याऐवजी आणखी वाढतो. तेव्हा रूग्ण डॉक्टरकडे जातात. इतकेच काय तर अनेकजण तर गुगल करून स्वत:च्या मनानेच औषधे घेतात. त्यामुळे अनेकांना सर्जरी करावी लागते.
पाइल्स म्हणजेच मूळव्याध रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. याला बदलती लाइफस्टाईल आणि खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी कारणीभूत असतात. लखनौच्या केजीएमयूमधील डॉ. अरशद यांनी सांगितले की, १० वर्षांआधी ओपीडीमध्ये रोज पाइल्सचे केवळ ५० रूग्ण यायचे. आता ही संख्या वाढून २५० झाली आहे.
(Image Credit : Aajtak)
डॉक्टर अरशद नवभारत टाइम्ससोबत बोलताना म्हणाले की. पाइल्स वाढण्याचं कारण बदलती लाइफस्टाईल आणि खाण्या-पिण्यात झालेले बदल हे आहेत. आजकाल फळं खाण्याऐवजी त्यांचा ज्यूस घेतला जातो. यात फायबर नसतं. पण आपल्या मोठ्या आतडीमध्ये केवळ फायबर आणि पाणी जातं. फास्ट फूडच्या चलनामुळे आणि फिजिकल अॅक्टिविटी कमी झाल्याने लोक पाणीही कमी पितात. याने लोकांना आधी पोटाच्या समस्या होतात, नंतर ते पाइल्सचे शिकार होतात. यापासून बचाव करण्यासाठी फळं-भाज्या खाण्यासोबत भरपूर पाणी सेवन करावं.
तसेच अलिकडे टॉयलेटमध्ये मोबाइल घेऊन जाण्याचं देखील प्रमाण वाढलं आहे. याबाबत त्यांनी सांगितले की, 'अलिकडे लोक टॉयलेटमध्ये फोन घेऊन जातात. त्यामुळे ते आत आधीपेक्षा जास्त वेळ घालवू लागले आहेत. याने पाइल्सचा धोका जास्त राहतो. यावर उपाय म्हणजे टॉयलेटमध्ये मोबाइल वापरू नका. तसेच पेपर किंवा पुस्तकं वाचू नका. तसेच इंडियन टॉयलेट सीटचा वापर करा.
कारणे –
* मलाबष्टंभ अथवा बद्धकोष्ठता (Constipation)
* अति तिखट, अती तेलकट तसंच बाहेरचे पदार्थ जास्त खाणे
* मांसाहार, मद्यसेवन, सिगारेट, तंबाखू सेवन
* सततचे बैठे काम
* अति जागरण
* जेवणाच्या आणि कामाच्या अनियमित वेळा
* कोरडे आणि शिळे अन्न खाणे
* अनुवांशिक