उन्हाळ्यात असो किंवा पावसाळा अनेकांन शूज घालूनच कामावर जावं लागतं. चारचौघात बुटांना घाणेरडा वास येत असेल तर खूप विचित्र वाटतं. त्यामुळे तुमचा मूड ऑफ होण्याची शक्यता असते. आज आम्ही तुम्हाला बुटांना येणारा वासामागचं कारणं आणि हा वास दूर करण्याचे उपाय सांगणार आहोत. उन्हात फिरताना मानेवर, अंडरआर्म्स मध्ये घाम येतो. या भागांवरचा घाम दिसून येतो, पण पायच्या तळव्यांना येणारा घाम दिसत नसल्यामुळे त्याचा त्रास फक्त त्या व्यक्तीलाच होतो. ज्याच्या पायावर घामामुळे दुर्गंधी निर्माण होते.
घाम आपल्याला शरीरावर तिथे येतो जिथे त्वचेवर रोमछिद्रे असतात किंवा केस असतात. पण एक खासप्रकारचा ओलावा तळहात आणि तळपायांवर येतो. या त्वचेवर रोमछिद्रे किंवा केस नसतात. घाम येणे ही एक सामान्य प्रक्रिया आहे. घाम हा रोमछिद्रांमधून येतो. ही नैसर्गिक प्रक्रिया आरोग्यासाठी चांगली असते. गरम वातावरणात घाम येणे किंवा एक्सरसाइज करताना घाम येणे सामान्य बाब आहे.
जर फार काळापासून तुम्हाला एखादं टेन्शन असेल किंवा स्ट्रेस असेल तर याचे आपल्या शरीरावर नकारात्मक प्रभाव दिसून येतात. त्यामुळे वेळीच टेन्शन आणि स्ट्रेस करण्याचा प्रयत्न करा. कारण या समस्येमुळे सतत घाम आणि दुर्गंधी येण्याची स्थिती उद्भवते.
उपाय
पायाला येणारा घाम आणि दुर्गंधी दूर करण्यासाठी टी सॉक्सचा वापर करा. टी सॉक्स पाण्यात घालून त्यात पाय बुडवून बसा. चहा मध्ये असलेल्या tannins यामुळे घामग्रंथी तात्पुरत्या आकुंचित होतात आणि त्यामुळे कमी घाम येतो.
शक्य असल्यास आलटून पाटलून शूज वापरा आणि वापरून झाल्यानंतर धुवायला टाका.
शूज काढल्यानंतर कोमट पाण्यात मीठ मिक्स करा आणि त्यात १५ ते २० मिनिटासाठी पाय टाकून ठेवा. यामुळे पायांपासून येणारी दुर्गंधी दूर होईल, सोबत थकवादेखील मिटेल.
पाण्यात व्हिनेगर टाका आणि एका आठवड्यापर्यंत रोज ३० मिनिटासाठी त्यात पाय टाकून ठेवावे. यामुळे दुर्गंधी तर दूर होईल शिवाय बॅक्टेरियाचे संक्रमणपासून बचाव होईल.
रोज अंघोळ झाल्यानंतर पायांना पावडर लावा. यामुळे पायांना घाम येणार नाही आणि दुर्गंधीदेखील दूर होईल.
चिंताजनक! कोरोना व्हायरसची झाली होती लागण, पण 'इतक्या' लोकांमध्ये आढळल्याच नाहीत काही अॅंटीबॉडीज!
धक्कादायक! चीनकडे होता जगातील सर्वात विध्वंसक 'टाईम बॉम्ब,' तज्ज्ञांचा अंदाज ठरला खरा