लग्नआधी महिला जशा दिसतात तशाच लग्नानंतरही दिसतील असं फारचं क्वचीत घडून येत. लग्नाआधी सगळ्याच मुलीं या बारिक सुडौल असतात. तसंच स्वतःला त्यांनी मेन्टेंनसुद्धा केलेलं असतं. पण लग्न झाल्यानंतर कदाचीत स्वतःकडे लक्ष द्यायला मिळत नाही म्हणून अनेक स्त्रीयांच वजन वाढतं जात. तसंच काही अशी कारण आहेत. ज्यामुळे नकळतपणे बायकांच्या कमरेचा, पोटाचा घेर तसंच हातांचं मास वाढतं जात. काही केल्या वाढलेलं वजन कमी करणं अवघड होऊन बसतं.
तसंच हवे तसे कपडे घालता येत नाही तसंच लग्नाआधी घालत असेलेले टॉप , जिन्स होत नाहीत, त्यामुळे अनेक महिला या शरीर दिसू नये म्हणून लूज कपडे खास करून कुर्ता घालण्यास प्राधान्य देतात. तुम्हाला सुद्दा अशाच परिस्थीतीचा सामना करावा लागत असेल तर जाणून घ्या लग्नानंतर वजन वाढण्याची काय आहेत कारणं. द ओबेसिटी जर्नल यात प्रसिध्द असलेल्या रिसर्चनुसार लग्नानंतर ५ वर्षांच्या आत सुमारे ८२ टक्के महिलांचे तसेच पुरूषांचे वजन ५ ते १० किलोंनी वाढते. यात महिलांचे प्रमाण अधिक असते.
खाण्यापिण्याच्या पध्दतीत बदल-
लग्नानंतर मुलींच घर बदत असतं. तसंच दैनंदिन आयुष्यातल्या अनेक गोष्टी या बदलत असतात. खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये बदल घडून येत असतो. जेवणात केला जाणारा तेलाचा तसेच मसाल्यांचा वापर यांमध्ये तफावत दिसून येते. आहारात झालेल्या बदलाचा परीणाम शरीरावर होऊन वजन वाढत जातं.
बाहेरचं खाणे
लग्नानंतर मित्र आणि नातेवाईकांच्या घरी जाऊन जेवणाचे प्रमाण वाढतं. तसंच अनेकदा आपल्या पती सोबत फिरायला गेल्यानंतर बाहेरचं खाल्यामुळे जास्त कॅलरिज कन्ज्यूम केल्यामुळे शरीरातील चरबी वाढते. गरजेपेक्षा जास्त आहार घेतल्यानेही समस्या होते.
स्वतःकडे लक्ष न देणे
लग्नानंतर सगळ्यात जास्त प्राधान्य या सासरच्या मंडळींना तसेच पतिच्या आवडीनिवडींना दिलं जात. यामुळे त्या मंडळीना खूश करण्याच्या नादात मसालायुक्त, तेलकट पदार्थ तयार केले जातात. तसंच जास्त मेहनत करून तयार केले जाणारे अन्न खराब होऊ नये म्हणून ओव्हरइटींग केलं जात त्यामुळे वजन वाढून लठ्ठपणा वाढू शकतो.
निष्काळजीपणा
लग्नाआधी अनेक मुली या डाएट तसंत चांगली शरीरयष्टी असावी यासाठी व्यायाम करत असतात. पण लग्नानंतर ऑफिस आणि घरातल्या कामांमुळे वेळ मिळत नाही. म्हणून व्यायाम करण्यासाठी महिला या फारश्या उत्साही नसतात. त्यामुळे शरीराच्या वेगवेगळ्या भागांचा आकार वाढत जातो.
ताण-तणाव
लग्न झाल्यानंतर अनेक महिलांना वेगवेगळ्या प्रसंगांना तोंड द्यावं लागतं त्यामुळे चिंता, ताण-तणाव जास्त घेतल्यामुळे शरीरावर त्याचा परीणाम होत असतो. तसंच ऑफिस आणि घरात दोन्ही ठिकाणी बेस्ट द्यायच्या प्रयत्न करत असताना आणि सगळ्या जबाबदाऱ्या पूर्ण करत असताना स्वतःकडे दुर्लक्ष होत त्यामुळे वजन वाढतं. आणि लग्नानंतर आपण जाड दिसायला लागतो.