(Image Credit : fitnessrunning.net)
अनेकदा लोक वजन कमी करण्यासाठी, शरीर मजबूत करण्यासाठी, हेल्दी राहण्यासाठी तासन्तास वर्कआउट करतात. जिममध्ये वर्कआउट करा किंवा घरी दोन्ही प्रकारे आरोग्यासाठी फायदेशीर असते. तुम्ही जिममध्ये वेगवेगळे वर्कआउट ट्रेनिंग घेता. पण तुम्ही कधी स्टिक्स ट्राय केलीय का? जर उत्तर नाही असेल तर कोर स्टिक्स एक्सरसाइज नक्की ट्राय करा.
कोर स्ट्रिक्सने केवळ शरीरच टोन्ड होतं असं नाही तर मांसपेशीही मजबूत होतात. अनेक सेलिब्रिटीही सध्या स्टिक्स एक्सरसाइज करू लागले आहेत. ज्या लोकांच्या चेहऱ्यावर कमी वयात वृद्धपणाचे संकेत दिसू लागतात किंवा ज्यांच्या चेहऱ्यावर सुरकुत्या येऊ लागतात असे लोकही स्टिक्स एक्सरसाइज करू शकतात. चला जाणून घेऊ काय आहे कोर स्टिक्स एक्सरसाइजचे फायदे.
कुठेही घेऊन जाऊ शकता
(Image Credit : stickmobility.co.uk)
कोर स्टिक्स तुम्ही कुठेही घेऊन जाऊ शकता. ही तुम्ही फोल्ड करूनही ठेवू शकता. तुम्ही हवं तर एक्सरसाइजसाठी खरेदी करून घरीही ठेवू शकता. हे एक्सरसाइजसाठी फारच फायदेशीर उपकरण आहे. कारण हे सहजपणे कुठेही सोबत कॅरी करू शकता.
शरीर होतं टोन
(Image Credit : thirdspace.london)
कोर स्टिक्सच्या मदतीने एक्सरसाइज केल्याने शरीर टोन होतं. तसेच याने कॅलरी बर्नही होण्यास मदत होते. कोर स्टिक्सवर नियमित एक्सरसाइज केल्याने तुम्हाला एक आकर्षक आणि परफेक्ट फिगर मिळण्यास मदत होते. तसेच याने शरीराची कार्यक्षमताही वाढते.
मांसपेशी होतात मजबूत
(Image Credit : pikdo.net)
कोर स्टिक्स एक्सरसाइजने अॅथलेटिक परफॉर्मन्समध्ये सुधारणा होते. कोर स्टिक्सवर वर्कआउट केल्याने तुमच्या मांसपेशी मजबूत होता. तसेच शारीरिक क्षमता, शक्ती, स्टॅमिना आणि शरीराची लवचिकताही वाढते.
शरीराची ताकद वाढवा
(Image Credit : usfitnesssupply.com)
याने शरीराची ताकद कायम ठेवण्यास मदत मिळते. यावर कुणीही आणि कोणत्याही वयाचे लोक वर्कआउट करू शकतात. व्हीलचेअरचा प्रयोग करणारे, वयोवृद्ध किंवा खेळाडूही सहजपणे यावर एक्सरसाइज करू शकतात. कोर स्टिक्स वेगवेगळ्या प्रकारचे रॉड्स असतात, ज्यात वेगवेगळ्या लेव्हल्स असतात.
एजिंगची लक्षणे होतात कमी
(Image Credit : kalgoorlietourism.com)
कोर स्टिक्ससोबत एक्सरसाइज केल्याने एजिंगची लक्षणे कमी होतात. याने वृद्धांना सुद्धा त्यांच्या शारीरिक क्षमतेनुसार वर्कआउट करण्यास मदत मिळते. यावर जे लोक दररोज एक्सरसाइज करतात, त्यांच्यात आत्मनिर्भरतेची समज विकसित होते. कोर स्टिक्सने कॅलरी बर्न होण्यासही मदत होते. तसेच एनर्जी आणि स्ट्रेंथचीही शरीरात निर्मिती होते.