कोणत्याही फिट आणि निरोगी व्यक्तीमागे त्याच्या रोगप्रतिकारकशक्तीचा मोठा हात असतो. रोगप्रतिकारकशक्ती चांगली असलेली व्यक्ती अनेक आजारांपासून स्वतःचं संरक्षण करू शकते. सध्या भारतात सुद्धा कोरोनाचं इन्फेक्शन वेगाने पसरताना दिसून येत आहे. अशा परिस्थितीत आजारांपासून वाचण्यासाठी तुम्ही सुद्धा तयार असणं गरजेचं आहे. म्हणजेच या युध्दात कोरोनाला हरवायचं असेल तर रोगप्रतिकारकशक्ती चांगली असणं गरजेचं आहे.
आज आम्ही तुम्हाला एका ज्यूसबद्दल सांगणार आहोत. त्या ज्यूसचा आहारात समावेश करून तुम्ही स्वतःचं आरोग्य चांगलं ठेवू शकता. हा ज्यूस तयार करण्यासाठी तुम्हाला जास्त सामग्रीची आवश्यकता नाही. कमीतकमी वेळात तुम्ही हा ज्यूस तयार करून पिऊ शकता. या ज्यूसचा आहारात समावेश करून तुम्ही रोगप्रतिकारकशक्ती वाढवू शकता.
या ज्यूस पालकापासून तयार केला जातो. पालकात अनेक पोषक घटक असतात. त्यामुळे शरीराला पोषण मिळत असतं. रोज सकाळी संध्याकाळी पालकाच्या ज्यूसचं सेवन करून तुम्ही स्वतःला कोरोना व्हायरस नाही तर अनेक आजाराांपासून लांब ठेवू शकता. ( हे पण वाचा- 'कोविड 19' च्या अर्थापासून ते कोरोना विषाणू दूर ठेवण्याच्या उपायांपर्यंत... सांगताहेत तज्ज्ञ डॉक्टर)
असं तयार करा
एक कप कापलेली पालक आणि अर्धा कप पाणी घ्या. सगळ्यात आधी कापलेला पालक पाण्याने स्वच्छ धुवा नंतर साफ करून घ्या, नंतर ज्यूसरमध्ये बारिक करून घ्या. नंतर पाणी घालून ज्यूस करून घ्या. मग हा ज्यूस काढून घ्या. तुम्हाला हा ज्यूस ज्यूसरमधून काढल्यानंतर डायरेक्ट प्यायचा नसेल तर जरा जाडसर पालकाची पेस्ट ठेवून जिरं आणि मीठ घालून फोडणी घालून सुपप्रमाणे पिऊ शकता. ( हे पण वाचा-Coronavirus : आता 'या' पद्धतीने कोरोनाला हरवा, तिसरा उपाय सगळयात इफेक्टीव्ह)