(Image Credit : FirstCry Parenting)
प्रिया गुरव
लग्नानंतर वर्षभरानंतर घरातील मंडळींना आणि नवीन लग्न झालेल्या जोडप्याला मूल हवं, असं वाटू लागतं आणि त्यादृष्टीने प्रयत्न चालू होतात. पण, गर्भधारणा होणं यातही अनेक अडचणी येतात. बदललेली जीवनशैली, खानपान, कामाच्या वेळा या सगळ्यांचा कदाचित परिणाम असू शकतो. पण, गर्भधारणा होण्यासाठी अनेकांना डॉक्टरी इलाज करावे लागतात किंवा गर्भधारणा झाली तरी त्या काळात विविध प्रकारचे त्रास त्या स्त्रीला सहन करावे लागतात.
गर्भधारणा न होण्यामागे अनेक कारणे असतात.
१) अनियंत्रित वजनवाढ : पतीपत्नी दोघांचीही होणारी वजनवाढ विचार करायला लावणारी आहे. दोघांचेही वजन जर वाढलेले असेल, तर गर्भधारणा होणं किंवा निकोप संतती होणं कठीण असतं. त्यामुळे बाळाचा विचार करताना दोघांनीही वजन नियंत्रित ठेवणे आवश्यक असते.
२) संप्रेरकांचे असंतुलन : हे देखील पतीपत्नी दोघांमध्ये आढळते. पण, गर्भधारणेसाठी आईची संप्रेरके संतुलित असणे अतिशय आवश्यक असतं. आईच्या संतुलित संप्रेरकांवरच गर्भधारणा, बालकाचा जन्म व आईचे दूध या सर्वच बाबी अवलंबून असतात. स्त्रीला जर थायरॉइड असेल, तर अनेकदा गर्भधारणा होणं कठीण होते.
३) रक्तक्षय : रक्तक्षय हा आजार स्त्रियांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळतो. त्यामुळे गर्भधारणा झाल्यावर अनेकदा माता आणि बाळ दोघांनाही त्रास संभवतो. अनेकदा कमी वजनाचं आणि अपुऱ्या दिवसाचं बाळ जन्माला येतं. वरील सर्व घटकांमध्ये आहार नियोजनबद्ध आणि योग्य पद्धतीने घेतला, तर चांगला बदल दिसून येऊ शकतो. नुसत्या औषधोपचारांपेक्षा आहाराचे नियोजन करणे आवश्यक आहे.
- जास्तीतजास्त पोषणमूल्ये आहारात कशी उपलब्ध होतील, यादृष्टीने आहाराचे नियोजन करावे. मिश्र डाळी, मिश्र कडधान्य, खिचडी, पालेभाज्या यांचा वापर आपण रोजच्या आहारात थोड्या प्रमाणात करू शकतो.
- जास्तीतजास्त पोषणमूल्ये आहारात कशी उपलब्ध होतील, यादृष्टीने आहाराचे नियोजन करावे. मिश्र डाळी, मिश्र कडधान्य, खिचडी, पालेभाज्या यांचा वापर आपण रोजच्या आहारात थोड्या प्रमाणात करू शकतो.