वजन कमी करण्यासाठी सध्या वेगवेगळ्या डाएट करण्याचं चलन आलं आहे. यात ग्लूटेन फ्री डाएटचाही समावेश आहे. ग्लूटेन एकप्रकारचं प्रोटीन आहे. जे गहू आणि यापासून तयार पदार्थांमध्ये आढळतं. ग्लूटेन जव, राई यामध्येही भरपूर प्रमाणात आढळतं. ग्लूटेनमध्ये वजन वाढण्याची मोठी भूमिका असते. त्यामुळे तज्ज्ञ ग्लूटेन फ्री डाएटचा सल्ला देतात. यासंबंधी वेगवेगळ्या माहितीमध्ये असा दावा केला जातो की, जर तुम्हालाही तुमचं ३ किलो वजन १५ दिवसात कमी करायचं असेल तर ग्लूटेन फ्री डाएट फॉलो करायला हवी.
काय आहे ग्लूटेन फ्री डाएट?
ही डाएट करण्याचा अर्थ हा आहे की, तुम्हाला गहू, जव आणि राईपासून तयार पदार्थांना आहारातून दूर करावं लागेल. ग्लूटेन फ्री डाएट वजन कमी करण्यासाठी चांगला पर्याय मानला जातो. तसेच असेही सांगितले जाते की, ग्लूटेनचं सेवन बंद करणे तुमच्या हेल्थसाठी हानिकारक नसतं. या डाएट प्लॅनमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त फळं आणि भाज्यांचं सेवन करावं लागतं. कारण यातून तुम्हाला भरपूर प्रोटीन मिळतात.
ही डाएट कशी ठरते प्रभावी?
ग्लूटेन तुमची भूक वाढवतं. त्यामुळे आहारात याचा समावेश करणे टाळावे. यात असे काही तत्व असतात जे भूक मारणाऱ्या मॉलिक्यूलला रोखतात. तुम्ही प्रमाणापेक्षा जास्त खाऊ लागता आणि अर्थातच तुमचं वजन वाढू लागतं. जर तुम्ही तुमच्या आहारातून ग्लूटेन बाहेर कराल आणि फायबर भरपूर प्रमाणात असलेल्या पदार्थांचं सेवन कराल तर तुमचं वजन कमी होऊ लागतं.
(Image Credit : Healthline)
ग्लूटेन डाएटचे फायदे
ग्लूटेन भरपूर प्रमाणात असलेले पदार्थ जास्त खाल्ल्याने छोट्या आतड्यांचं नुकसान होतं. जर हे आहारातून दूर केलं तर, ही समस्याही दूर होऊ शकते. छोट्या आतड्यांच्या समस्येतून बाहेर येण्यासाठी काही महिने लागू शकतात. मात्र जर तुम्ही ग्लूटेन फी डाएट गंभीरतेने कराल तर तुम्हाला लवकर आराम मिळू शकतो.
ग्लूटेन फ्री डाएट वजन कमी करण्यासाठी फायदेशीर आहे. पण ही डाएट फार जास्त काळ करु नये. फिटनेसबाबत जागरुक असणारे लोक ग्लूटेन फ्री डाएटचे लहान कोर्स करतात, याने त्यांना फायदा होतो.
ग्लूटेन फ्री डाएट कुणासाठी?
ग्लूटेन गहू, राई आणि जवामध्ये असलेलं प्रोटीन आहे. सेलियक रोग असलेल्या लोकांनी ग्लूटेन फ्री डाएट करायला हवी. सेलियक ही समस्या पचनक्रियेशी संबंधित समस्या आहे. या डाएटमुळे हा आजार असलेल्या लोकांची रोगप्रतिकार शक्ती वाढते.