वजन वाढण्याची समस्या ही सध्याच्या काळात भरपूर महिलांमध्ये दिसून येते. वजन वाढल्यानंतर ते कमी करणं फार कठिण होऊन बसतं महिलांना हवेतसे कपडे घातला येत नाही. तसंच काही महिन्यांपूर्वी घेतलेले आवडणारे कपडे घट्ट व्हायला लगातात. अनेकदा महीला असा विचार करतात की एखादा कुर्ता किंवा टॉप बारिक झाल्यानंतर घालू पण अनेक दिवस ते कपडे तसेच पडून राहतात. तसंच शरीराच्या वेगवेगळ्या भागांवर फॅट्स जमा झाल्याने खराब दिसू लागतं. आकार वाढतं जात असतो.
सर्वसाधारणपणे मांड्या, कंबर,पोट किंवा, मागच्या बाजुला फॅट्स जमा झालेलं असतं, तसेच सगळ्यात चिंतेची बाब म्हणचे जेव्हा आर्म फॅट वाढतं तेव्हा हात खूप खराब दिसायला लागतात. आणि तुम्ही खूपचं जाड दिसायला लागता. तसंच स्लिव्जलेस ड्रेस घालताना १० वेळा विचार करायला लागतो. हे वाढलेले अतिरिक्त फॅट्स कमी करण्यासाठी नेमकं काय करावं हे कळत नाही. रोजच्या धकाधकीच्या आय़ुष्यात घरचं, ऑफिसचं काम करत असताना स्वतःकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नाही. व्यवस्थित जेवायला सुध्दा वेळ मिळत नाही. त्यामुळे डाएट वैगेरे करणं तर लांबच राहीलं. जर तुम्ही सुध्दा अशाच परिस्थितीचा सामना करत असाल तर सोप्या पध्दतीने तुम्ही घरच्याघरी फॅट्स कमी करून स्वतःच आरोग्य नीट ठेवून फिट राहू शकता.
ज्या महिलांना लठ्ठपणाची समस्या असते. त्याच्या हातांचे मास हे लटकलेले असते. शरीराची हालचाल न केल्यामुळे किंवा हेल्दी आहार न घेतल्यामुळे आर्म फॅट वाढत जातं. जर तुम्हाला हातांचे वाढलेलं मासं कमी करायचं आहे तर काही एक्सरसाईज करुन तुम्ही ते कमी करू शकता.
बटरफ्लाय एक्सरसाईज
(image credit-fitkursdy)
या एक्सरसाईजच्या मदतीने तुमच्या केवळ हाताचीच चरबी नाही तर, शरीरातील अन्य भागाची चरबीदेखील कमी होते. त्यासाठी सर्वात पहिल्यांदा तुम्हाला सरळ रेषेत उभं राहून दोन्ही हात समोर उभे करायचे आहेत. आता हाथ खाद्यांच्या रेषेत समोर आणून तळवे जमिनीच्या दिशेने ठेवा. आता हात घड्याळ्याच्या काट्याप्रमाणे फिरवा. मग पुन्हा उलटे फिरवा. असं कमीत कमी १५ ते २० वेळा करा.
ट्रायसेप्स डिप्स
(image credit-verywellfit)
चरबी कमी करण्यासाठी ट्रायसेप्स डिप्स हा प्रभावी पर्याय आहे. यासाठी तुम्ही एका खुर्चीवर बसा आणि तुमचे हात खुर्चीच्या किनाऱ्यावर ठेऊन खुर्ची पकडा आणि आपले पाय समोर घ्या. आता तुमचं शरीर थोडं पुढे घ्या आणि आपले पाय सरळ ठेवा आणि तुमचे हात मागे घ्या जेणेकरून तुम्ही स्वतःला नीट पकडू शकाल. तुमचं शरीर जमिनीवरून नीट उचललं गेलं आहे की नाही याची नीट खात्री करून घ्या. हळू हळू तुमच्या ट्रायसेप्सचा उपयोग करून शरीर उचला आणि मग परत खाली आणा. पहिल्यांदा याचे तीन सेट करा आणि नंतर हळू हळू वाढवत रोज सेट पूर्ण करा.