आकर्षक दिसण्यासाठी आपण नेहमीच प्रयत्न करत असतो. सध्याच्या काळात वजन जास्त असण्याची समस्या सर्वाधिक महिलांमध्ये दिसून येते. त्यासाठी व्यायामासोबतच आहारात काही बदल करता येईल का याचा विचार आपण करत असतो. कारण अनेकजण डाएट करायचं म्हणजे काय करायचं किती खायचं आणि किती नाही याबाबत संभ्रमात असतात. जर तुम्हाला आज आम्ही आहाराविषयी टीप्स सांगणार आहोत ज्या तुम्हाला वजन कमी करण्यासाठी तसंच आरोग्य व्यवस्थित राहण्यासाठी फायदेशीर ठरतील.
भात आणि चपाती हे भारतीय संस्कृती मधील महत्वपूर्ण आहारात समाविष्ट होतात. भारतातील सर्वाधिक लोकं भात आणि चपातीचं सेवन करतात. पण ज्या लोकांना वजन कमी करायचे असतं, किंवा बारीक व्हायचं असतं ते लोकं चपाती खाणं सोडून देतात. तसंच वजन कमी करण्यासाठी कमी कार्बोहायड्रेट्स घेणं ही सामान्य गोष्ट आहे. म्हणूनच लोकं भात खाणं टाळतात. (हे पण वाचा-दुधासोबत गुळाचं सेवन कराल तर वेगाने कमी होईल वजन, फायदे वाचून व्हाल अवाक्)
आरोग्यतंज्ञाच्यामते भारतीय आहारात कार्बोहाईड्रेटस खुप जास्त प्रमाणात असतात. त्याचसोबत प्रोटिन्स सुद्धा असतात. चपातीमध्ये कार्बोहाईड्रेट्स सोबत कार्बज पण असतात. याशिवाय अनेक पोषक घटकांचा समावेश असतो. ज्या घटकांमध्ये प्रोटिन्स आणि फायबर हे प्रमुख असतात. या घटकांची शरीराला आवश्यकता असते. चपातीमध्ये १५ ग्राम कार्बस, ३ ग्राम प्रोटिन्स आणि ०.४ ग्राम फॅट आणि ७१ कॅलरीज असतात. तांदळात कार्बोहाईड्रेटस जास्त असतात. १ ग्राम प्रोटीन, ०.१ ग्राम फॅट आणि १८ ग्राम कार्बोहाइड्रेट तसंच ८० कॅलरीज असतात.
चपाती आणि भात या दोन्ही पदार्थात उर्जा देणारे घटक असतात. व्हिटामीन्स सुद्धा असतात. शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत राहण्यासाठी चपाती किंवा भात खाणं फायद्याचे ठरतं. जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर तुम्ही भात किंवा चपाती खाणं पुर्णपणे बंद करणं योग्य नाही. २२५ ते ३२५ इतक्या प्रमाणात कार्बसचं सेवन करणं गरजेचं आहे. रोजच्या जेवणात जर तुम्ही २ चपात्या खात असाल तर एक वाटी भात खाणं गरजेचं आहे. (हे पण वाचा-ऑफिसमध्ये बसून वजन वाढलय? 'या' उपायांचा वापर कराल तर आकर्षक दिसाल)
जर तुम्हाला वजन कमी करायचं आहे तर रात्रीच्यावेळी भात खाणं टाळायला हवं. किंवा न्युट्रिशियन्सचा सल्ला घेऊन तुम्ही रात्रीचे जेवण पुर्णपणे बंद करू शकता त्यामुळे तुम्हाला जेवणासाठी पर्यायी आहार म्हणून पोषक आहार घेणं गरजेचं आहे.