Heart Health: आजकाल कमी वयातच अनेक लोकांना आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्या होत असतात. अनेकांना पायऱ्या चढताना श्वास भरून येणे किंवा घाम येणे किंवा खूप थकवा जाणवणे अशा समस्या होतात. तुम्हालाही असं होत असेल तर वेळीच सावध होण्याची गरज आहे. कारण हा हृदयासंबंधी आजारांचा संकेत असू शकतो.
एक्सपर्ट्सनुसार, जर काही पायऱ्या चढूनच छातीत वेदना होत असेल किंवा हृदयावर दबाव पडत असेल, घाम येत असेल किंवा चक्कर आल्यासारखं वाटत असेल तर याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. कारण यामुळेच हृदयाचं नुकसान होतं आणि हे जीवघेणंही ठरू शकतं.
हृदयाची टेस्ट
एक्सपर्ट्सनुसार, हृदय बरोबर काम करत आहे की, नाही हे जाणून घेण्याची एक फार सोपी पद्धत आहे. स्पेनच्या यूनिव्हर्सिटी हॉस्पिटलमध्ये कार्डिओलॉजिस्ट आणि या रिसर्चचे लेखक डॉक्टर जीसस पेटेइरो यांनी हेल्थलाइन वेबसाइटला सांगितले की, 'स्टेअर्स(पायऱ्या) टेस्ट हृदयाचं आरोग्य जाणून घेण्याची एक सोपी पद्धत आहे. जर तुम्हाला 60 पायऱ्या चढायला दीड मिनिटांपेक्षा अधिक वेळ लागत असेल तर याचा अर्थ आहे की, तुमचं हृदय पूर्णपणे फिट नाही आणि तुम्हाला डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे'.
हेल्दी हार्टसाठी काय खावे काय खाऊ नये?
1) सर्वातआधी तर आपल्या डाएटमध्ये बदल करा आणि हेल्दी हार्टसाठी हेल्दी डाएट घ्या. वय कोणतंही असो हेल्दी डाएट फार गरजेची आहे. हिरव्या भाज्या आणि फळांचं अधिक सेवन हार्टसाठी चांगलं आणि जंक फूड व रेड मीटचं सेवन हार्टसाठी नुकसानकारक मानलं जातं. तसेच भरपूर प्रमाणात पाणी पिणंही गरजेचं आहे.
2) एक रूटीन लाइफ फॉलो करा. तुमचं रूटीन बदललं की, तुमच्या हार्टला समस्या होऊ शकते. नियमित आवश्यक तेवढा व्यायाम करा, पायी चाला, भाज्यांचं सेवन करा आणि भरपूर पाणी प्या. तसेच चुकीच्या सवयी पूर्णपणे दूर करा. तरच तुमचं हार्ट हेल्दी राहू शकतं. 3) डॉक्टरांनी सांगितलं की, हृदय निरोगी आणि फीट ठेवण्यासाठी रोज 30 मिनिटांपर्यंत एक्सरसाईज करा. जर तुम्ही किंवा रनिंग करता किंवा चालायला जाता तर स्पीड जास्त ठेवा. दररोज 10 हजार पावलं पायी चालल्याने हृदय निरोगी राहतं.
4) हृदय चांगलं ठेवण्यासाठी सर्वात फायदेशीर ठरतात ती वेगवेगळी फळं आणि वेगवेगळ्या हिरव्या भाज्या. तसेच ड्राय फ्रूट्स, नट्स आणि सीड्स जसे की, बदाम, अक्रोड, पिस्ता, शेंगदाणे, कलिंगड इत्यादींच्या बीया आरोग्यासाठी फायदेशीर असतात.
5) दूध, दही, ताक यानेही आरोग्य चांगलं राहतं. तसेच ग्रीन, ब्लॅक टी चं सेवन करूनही शरीरातील कोलेस्ट्रॉलचं प्रमाण कमी करू शकता. म्हणजेच याने हृदय निरोगी राहतं.
6) प्रोसेस्ड आणि प्रिजर्व्ड म्हणजे डब्यात बंद असलेले पदार्थ खाल्ल्याने आरोग्य खासकरून हृदयाला जास्त नुकसान होतं. 'रेडी टू इट' म्हणजे सेमी कुक्ड पदार्थ जसे की, भाज्या, बिर्याणी, पराठे, मिठाई इत्यादी तसेच पॅकेटमधील ज्यूस, सॉफ्ट ड्रिंक्स सुद्धा हृदयासाठी नुकसानकारक ठरतं.
7) अनेकांना जेवणात वरून मीठ घेण्याची सवय असते. पण त्यांना हे माहीत नसतं की, त्यांची ही सवय त्यांच्यासाठी फार जास्त घातक आहे. तसेच वेगवेगळ्या फास्ट फूडमध्येही मिठाचं प्रमाण अधिक असतं. जास्त मिठामुळे हृदयाचं नुकसान होतं. त्यामुळे मीठ आणि साखरेचं सेवन कमीत कमी करा.