ऑफिसमध्ये तसंच घरी नवीन वर्षाचे स्वागत करत असताना आपण खाण्यापिण्यात ताळमेळ ठेवत नाही. त्यामुळे वजन वाढण्याची समस्या जाणवते. वारंवार त्याच चुका केल्यामुळे शरीरारावरची वाढलेले चरबी घटवणं हे मोठं आवाहन ठरतं. जर तुम्ही सुद्धा वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असाल तर काही गोष्टींची माहीती नसल्यामुळे तुमची मेहनत वाया सुद्धा जाऊ शकते. चला तर मग जाणून घेऊया वजन कमी करत असताना कोणत्या चुका करणं महागात पडू शकतं.
नाष्ता न करणे
जर तुम्ही नेहमी कॉलेज किंवा कामासाठी सकाळी बाहेर पडत असाल तर नाष्ता करणं महत्वाच असतं. कारण जर तुम्ही नाष्ता न करताच घराबाहेर पडत असाल तर तुमचं वजन जास्त वाढण्याची शक्यता असते. जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर सकाळी घराबाहेर पडताना नाष्ता करणं गरजेचं आहे. कारण त्यावेळी कॅलरीज बर्न होत असतात. नाष्ता करताना तुम्ही त्याचे योग्य प्रमाण ठरवून करायला हवा.
कार्डीओ व्यायाम
चालणे, सायकलिंग करणे, धावणे किवा कार्डीओच्या उपकरणांचा वापर करून व्यायाम केल्याने खूप घाम येतो. त्यामुळे कॅलरीज बर्न होतात. तसंच फॅट्स लॉस होण्यासाठी मदत होते. त्यामुळे शरीरावरची अतिरीक्ति चरबी कमी होते.
मीठाचं सेवन
जर तुम्हाला झटपट वजन कमी करायचं असेल तर आहारात शक्यतो मीठाचा समावेश कमी असावा. चिप्स किंवा तळलेले पदार्थ खाण्याआधी विचार करा. कारण त्यामुळे शरीरातील पाण्याचं प्रमाण वाढते. त्यामुळे वजन कमी होणार नाही तर अधिकच वाढत जाईल त्यामुळे आहारात मीठाचा समावेश करत असाल तर योग्य प्रमाणात करा.
प्रोटीन्सचा आहार घेणे
शरीरातील मसल्सना प्रोटिन्सची आवश्यकता असते. तसंच एमिनो एसिड् सुद्दा गरजेचे असते. यासाठी आहारात अंडी, दूध यांचा जास्त समावेश असू द्या. तसंच शरीरातील हाडांना बळकटी देण्यासाठी प्रोटिन्स घेणं आवश्यक आहे.
कमी झोप
सध्याच्या व्यस्त जीवनात खाण्यापिण्याच्या आणि झोपेच्या वेळा चुकत असतात त्यामुळे शरीरावर नकारात्मक परीणाम होत असतो. झोप कमी झाल्यामुळे शरीरातील कॉर्टिसोल आणि कार्बोहाईड्रेट्सचे प्रमाण वाढत असते. त्यामुळे चरबी वाढण्यास उत्तेजन मिळत असते. म्हणून योग्य प्रमाणात झोप घेणं आवश्यक आहे.
व्यायामाचा अभाव
व्यस्त जीवनशैलीत आपण आपल्या जबाबदाऱ्या पूर्ण करत असतो. पण व्यायाम आणि शारीरिक हालचाल न केल्य़ामुळे वेगवेगळ्या समस्यांना समोरं जावं लागतं. हाडांना मजबूत करण्यासाठी तसंच रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी व्यायाम करणं गरजेचं आहे.