शहरं
Join us  
Trending Stories
1
सारे अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात, मुकेश अंबानींनी तर अमेरिकेतच पैसा ओतला... मोठी डील...
2
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
3
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
4
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
5
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
6
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
7
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
8
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
9
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
10
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
11
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
12
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
13
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
14
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
15
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
16
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
17
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
18
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा
19
SA vs SL Test : श्रीलंकेचा संघ ४२ धावांत All Out! ६४ ओव्हर्समध्ये पडल्या २० विकेट्स
20
'ये है मोहोब्बते' फेम अभिनेत्याचा झाला साखरपुडा, होणाऱ्या बायकोसाठी लिहिली सुंदर पोस्ट

रोजचा एक पेग ठरू शकतो जीवघेणा, अडकू शकता कॅन्सरच्या जाळ्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2019 10:13 AM

काहीजण थकवा घालवण्यासाठी तर काहीजण आवड म्हणून दारू पितात. रोजच्या ताण-तणावाच्या आयुष्यातून रिलॅक्स होण्यासाठी बिअर पितात.

काहीजण थकवा घालवण्यासाठी तर काहीजण आवड म्हणून दारू पितात. सर्वसाधारणपणे रोजच्या ताण-तणावाच्या आयुष्यातून रिलॅक्स होण्यासाठी बिअर पितात. जर तुम्ही रोज दारू खास करून जर वाईन पित असाल, तर तुमच्या जीवाला धोका उद्भवू  शकतो.  रोज दारू प्यायल्याने कॅन्सरसारखे जीवघेणे आजार होण्याची दाट शक्यता असते. 

जपान येथे करण्यात आलेल्या एका रिसर्चमध्ये एक धक्कादायक बाब समोर आली आहे. ज्यात असे निदर्शनास आले की  रोज रेड वाईन प्यायल्याने शरीरातील कॅन्सरचे सेल्स उत्तेजीत होतात. त्यामुळे शरीरात कॅन्सरच्या पेशी वाढण्याचा धोका असतो. अतिप्रमाणात मदयपान केल्याने छोटं आतडं आणि मोठं आतडं यांच्यावर परिणाम होतो. यामुळे डायरिया सारखे दीर्घकालीन आजार संभवतात. शिवाय मद्यपानामुळे छातीत जळजळण्याच्या प्रमाणातही वाढ होते.

 या आधी करण्यात आलेल्या संशोधनात काही गोष्टी उघड झाल्या होत्या. रेड वाईन प्यायल्याने कॅन्सरचे सेल्स वाढतात तसंच कमी सुध्दा होतात. पण सध्या झालेल्या संशोधनात असे निदर्शनास आले की रेड वाईन प्यायल्यामुळे कॅन्सरचा धोका वाढतो. जपानच्या अनेक नामवंत हॉस्पीटलमध्ये कार्यरत असलेल्या वैद्यकीय तज्ञांनी अनेक शोधांनंतर हा दावा केला आहे.

 या रिसर्चसाठी तब्बल 63 हजार दोनशे ३२ लोकांच्या  दारू पिण्याच्या सवयींवर पाळत  ठेवण्यात आली होती. त्यानंतर त्यांना दारू प्यायल्यानंतर त्यांच्या शरीरात जो बदल घडून येतो.  त्याचे विश्लेषण करण्यात आले. मागच्या १० वर्षांपासून जी लोक रोज रात्री दारू पित आहेत. त्यांना गॅस्ट्रोइन्टस्टायनल कॅन्सर, ब्रेस्ट कॅन्सरचा धोका अधिकाधिक वाढला आहे. एक पेग पिण्याऱ्यांच्या तुलनेत रोज दोन पॅग पिणाऱ्या लोकांना कॅन्सर मोठ्या प्रमाणत उद्भवतो. या  रिसर्चनुसार सर्वाधीक लोकांचा मृत्यू हा दारू पिण्याच्या सवयीमुळे झाला आहे. या रिसर्चचे मुख्य कर्तेधर्ते टोकियो युनिव्हरसिटीतील लेखक मासायोशी ज़ित्सु आहेत.

दारूच्या सेवनाने ज्या प्रमाणे मेंदूवर परिणाम होतो. तसाच झोपेवरही होतो. अतिप्रमाणात दारू प्यायल्याने तुम्हाला शांत झोप लागू शकत नाही. पुरेशी झोप न मिळाल्याने चिडचिडेपणातही वाढ होते. त्यांमुळे रोज दारूचे सर्वाधीक सेवन करणं टाळा. 

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स