(image credit- telegraph.co.uk)
अनेक पुरूष तसचं महिलांना वजन वाढण्याची समस्या उद्भवते. सध्याच्या काळात बरेचजण आपल्या आरोग्याबाबत जागरूक दिसून येतात. त्यामुळे डाएटिंग आणि जीमला जाणं हे तर खूप कॉमन झालं आहे. प्रत्येकालाच आकर्षक दिसायचं असतं त्यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करत असतो. अनेकदा असं होत की वजन कमी करण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न करून म्हणजेच आहार व्यवस्थित घेऊन आणि डाएटिंग करून सुद्धा आपलं वजन कमी होत नाही.
वजन कमी न होण्यामागे वेगवेगळी कारणं असू शकतात. ही कारणं तुम्हाला माहित असणं फार आवश्यक आहे. कारण तुम्ही वजन कमी करण्याचे प्रयत्न करताना जर चुका केल्यात वजन कमी करणं कठिण होऊन बसतं. चला तर मग जाणून घेऊया वजन कमी न होण्यास कोणते घटक कारणीभूत ठरतात.
अनेकजण तेलकट किंवा बाहेरचे पदार्थ खाताना खूप विचार करत असतात. पण तुम्हाला माहित आहे का खाण्यापिण्याच्या बाबतीत या गोष्टींची काळजी घेऊन सुद्धा वजन कमी होत नाही. याचं कारण मायक्रोबायोम असू शकतं. ( हे पण वाचा-Coronavirus Symptoms And Precautions : जाणून घ्या coronavirus'ची लक्षणे आणि खबरदारीचे उपाय)
मायक्रोबायोम आपल्या शरिरात असलेले बॅक्टिरीया आणि वायरस यांना एकत्र करते. आपल्या आतड्यांमध्ये लाखो बॅक्टिरीया असतात. यांनाच सामुहिकरित्या मायक्रोबायोम असे म्हणतात. हा कधीही स्थिर नसतो. सतत बदलत असतो. मायक्रोबायोममुळे शरीरात चांगले आणि वाईट दोन्ही बदल होत असतात. वाढत जाणारा बदल अनेक प्रकारच्या आजारांना निमंत्रण देऊ शकतात. यामुळे लठ्ठपणा, डायबिटीस, अंगाला सूज येणे यांसारखे आजार होण्याची शक्यता असते.आपल्या पोटातील बॅक्टीरीया आतड्यांना प्रभावित करत असतात. झोपायची चुकिची पध्दत आणि पोटातील अस्वस्थता यामुळे ताण- तणाव आणि डिप्रेशनचे प्रमाण वाढते. यामुळे झोप न येण्याची समस्या उद्भवते. (हे पण वाचा-जगाची चिंता वाढवणाऱ्या Corona Virus चं मूळ सापडलं, 'या' प्राण्यापासून मनुष्यांना झाली लागण!)
आतडे चांगले आणि साखर आणि कार्ब्स असलेल्या पदार्थांचा आहारात समावेश करू नका.
जास्त फायबर असलेल्या पदार्थांचे सेवन करा.
आपल्या आहारात जास्तीत जास्त भाज्यांचा समावेश करा. ज्यामुळे तुमचे आतडे चांगले राहतील.
कमी फॅट्स असलेल्या पदार्थांचे सेवन करा.
तळलेले पदार्थ खाऊ नका.
आहारात राईच्या तेलाचा वापर करा. त्यामुळे आतडयांची सूज कमी होण्यास मदत होईल.
एंटीबायोटिक्स आणि गोळ्या घेऊ नका
सर्वसाधारणपणे काहीही लहान मोठी समस्या उद्भवल्यास आपण दवाखान्यात जात असतो. गोळयांचं सेवन हे अनेकदा केलं जातं. पण याच गोळ्यांच्या सेवनामुळे तुमचं वजन वाढून लठ्ठपणाचं शिकार सुद्धा होऊ शकता. तसंच मासिक पाळी अनियमीत येण्याची समस्या सुद्धा उद्भवू शकते. कोणत्याही प्रकारच्या व्हिटामीन्सच्या आणि कॅल्शियमच्या गोळ्या जास्त प्रमाणात घेतल्यास आजार होण्याची शक्यता असते.