(image credit- first cry paraenting)
सध्याच्या काळात वजन वाढण्याची समस्या सर्वाधिक जाणवते. दिवसेंदिवस वजनात वाढ होत असलेल्या लोकांचे प्रमाण वाढत चालले आहे. या समस्येचे रुपांतर स्थूलता आणि लठ्ठपणा या आजारांमध्ये होते. सध्याच्या काळातील परिस्थिती पाहता सर्वाधिक रुग्ण हे लठ्ठपणाचे आहेत . आपण सुद्दा दैनंदिन जीवन जगत असताना वेगवेगळे उपाय करून पाहत असतो. पण वजन कमी होत नाही. डाएट करण्यापासून जीमला जाण्यापासून सगळे उद्योग केले तरी वजन कमी होत नाही. झाल्यास ते परत तितक्याच वेगाने वाढतं. पण तुम्हाला माहीत आहे का असं का होतं.
खाण्यापिण्याच्या पद्धती अतिशय चुकीच्या असल्यामुळे आणि आहारात पोषक घटकांचा समावेश नसल्यामुळे ही समस्या उद्भवते. चला तर मग जाणून घेऊया वजन वाढण्याची मुख्य कारणं काय आहेत. जर तुम्ही वजन वाढण्यामागे कारणीभूत ठरत असणारे घटक समजावून घेतले तर तुमचं काम सोपं होईल आणि तुम्ही वजन कमी करण्यात यशस्वी ठरू शकता.
व्हिटामीन डी ची कमतरता
व्हिटामीन डी च्या कतरतेमुळे वजन वाढतं. तसंच यासाठी कोवळ्या उन्हात येणं आवश्क असतं. त्यासाठी तुम्ही दररोज व्यायाम करता करता कोवळ्या उन्हात उभं राहणं आवश्यक आहे. हा प्रयोग केल्यास वजन कमी होण्यास अडचण निर्माण होणार नाही. तसंच वजन घटवण्यासाठी नुसते कार्बोहायड्रेट्स कमी करायचे आणि प्रोटिन्स वाढवायचे असे करू नये. कारण वजन कमी करायचं असेल तर चरबी घटली पाहिजे. आणि ते प्रोटीन्स, कार्ब्स आणि चांगले फॅट्स यांच्या संतुलनातूनच होईल.
उशीरापर्यत काम करणं.
जर तुम्ही उशीरापर्यंत काम करत असाल तर तुम्हाला वजन कमी करण्यास अडथळा निर्माण होईल. तंसच कॅलरी बर्न न होता फॅट्स अधिक वाढत जातील. म्हणून तुम्ही शक्य होईल तितकं लवकरात लवकर झोपण्याचा प्रयत्न करा. जेणेकरन तुम्ही जर व्यायाम करत असाल तर झोपल्यानंतर तुमच्या शरीरावर त्याचा प्रभाव दिसून येईल. त्यासाठी रोज आठ- तास झोप घेणे गरजेचे आहे.
फोनचा अतिवापर
मोबाईलफोनचा अतिवापर केल्यामुळे शरीरातील सक्रियता कमी होते आणि वजन वाढायला सुरूवात होते. फोनचा जास्त वापर करत असाल तर तुमचे खाण्यापिण्याकडे सुद्धा लक्ष नसते. त्यामुळे तुमच्या आहारातील पोषण योग्य प्रमाणात तुम्हाला मिळत नाही परिणामी वजन वाढण्याची समस्या निर्माण होते.
जेवण न करणे
काहीजण वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असताना मोठ्या चुका करतात. त्याचा वार्ईट परीणाम सुध्दा सहन कारावा लागू शकतो. म्हणजेच जर तुम्ही बारीक होण्यासाठी जेवण सोडण्याचा विचार करता तेव्हा आरोग्याचं मोठं नुकसान होत असतं. त्यामुले जेवण आणि ब्रेकफास्ट वेळच्यावेळी घ्यायलाच हवा. फक्त खाताना जास्त फॅट्स असणारे किंवा गोड पदार्थ टाळा.