शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंना दिल्लीत आणा, ऐकलेच नाहीत तर भाजपाने अजित पवारांसोबत सत्ता स्थापन करावी; केंद्रीय मंत्र्याचे वक्तव्य
2
एकनाथ शिंदेंनी मोदी-शाहांकडे कळवला निर्णय; मुख्यमंत्रिपदावरून काय बोलले?
3
हरयाणा, महाराष्ट्रानंतर आता भाजपाचा दिल्लीवर डोळा, केजरीवालांना नमवण्यासाठी आखली अशी रणनीती
4
मोठी बातमी: दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत एकनाथ शिंदेंनी दिला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा
5
Pune Crime: महिलेची हत्या, पोत्यात बांधून झुडपात फेकला मृतदेह; घटना कशी आली उघडकीस?
6
Fact Check : नागपुरात EVM सह भाजपाचे कार्यकर्ते पकडल्याचा दावा खोटा; नेमकं प्रकरण काय?
7
Baba Siddiqui :"लॉरेन्स बिश्नोई गँगने मूर्ख बनवलं, दाऊदचा फोटो दाखवला अन्..."; आरोपीचा खळबळजनक खुलासा
8
"रेशीमगाठ कधीच झाकोळली गेली नाही...", प्राजक्ताची मालिकेसाठी खास पोस्ट; प्रेक्षकांचे मानले आभार
9
सर्वात मोठी डिजिटल अरेस्ट! १ महिना WhatsApp कॉलवर Live; लुटले तब्बल ३.८ कोटी
10
नामांकित कॉलेजमधील शिक्षकाकडून विद्यार्थिनीसोबत व्हॉट्सॲपवर अश्लील चॅटिंग; अकोले इथं तणाव
11
मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब? दिल्लीत झाला निर्णय, सूत्रांची माहिती
12
भारतात रिअल इस्टेटमधील सर्वाधिक श्रीमंत उद्योजकांकडे किती संपत्ती?
13
हलगर्जीपणाचा कळस! प्रसूतीनंतर डॉक्टरांकडून पोटात राहिला 'टॉवेल'; महिलेला प्रचंड वेदना अन्....
14
Perfect Tea Recipe: टपरीवरचा फक्कड चहा बनवा घरच्या घरी; फक्त 'आलं' टाकताना करा 'हा' छोटासा बदल!
15
Vodafone Idea च्या शेअर्समध्ये १७% ची तेजी, सरकारच्या एका निर्णयामुळे गुंतवणूकदारांच्या उड्या
16
HDFC Life Insurance Data Leak : 'या' दिग्गज लाइफ इन्शुरन्स कंपनीचा डेटा लीक; तुम्ही तर नाही आहात ना पॉलिसी होल्डर?
17
रॅपर बादशाहच्या चंदीगढमधील नाईटक्लबमध्ये धमाका, मध्यरात्री दोन अज्ञातांनी घडवून आणला स्फोट
18
Utpanna Ekadashi 2024: उत्पत्ती एकादशीनिमित्त पापमुक्तीसाठी विष्णूपूजेत 'ही' फुले अवश्य अर्पण करा!
19
ए.आर.रहमानसोबत अफेअरच्या चर्चांवर मोहिनी डेने सोडलं मौन; म्हणाली- "मी त्यांना कायम..."
20
कामाची बातमी! पत्नीसह ज्वाइंट होम लोन घ्या, कमी व्याज, अधिक रक्कम; अनेक फायदे मिळतील

सुदृढ राहण्यासाठी फक्त मॉर्निंग वॉक करु नका; जाणून घ्या चालण्याची योग्य पद्धत, तरच होईल आरोग्याला फायदा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 07, 2021 3:23 PM

आपण दररोज चालायला हवे, कारण असे केल्याने व्यक्तीचा लठ्ठपणा, डायबिटीस, पोटावरील चरबी आणि हृदयरोगाचा धोका कमी करू शकतो. पण या आजारांपासून संरक्षण मिळवण्यासाठी आणि शरीर सुदृढ करण्यासाठी केवळ चालणेच नव्हे, तर योग्य प्रकारे चालणे आवश्यक आहे.

शरीराला तंदुरुस्त आणि आरोग्यदायी ठेवण्यासाठी तसेच विविध आजारांपासून संरक्षण करण्यासाठी दररोज व्यायाम करणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे सर्व आरोग्य तज्ज्ञ हाच सल्ला देतात की, आपण दररोज चालायला हवे, कारण असे केल्याने व्यक्तीचा लठ्ठपणा, डायबिटीस, पोटावरील चरबी आणि हृदयरोगाचा धोका कमी करू शकतो. पण या आजारांपासून संरक्षण मिळवण्यासाठी आणि शरीर सुदृढ करण्यासाठी केवळ चालणेच नव्हे, तर योग्य प्रकारे चालणे आवश्यक आहे.

तुम्हाला कदाचित माहित नसेल की, चालण्याची ही एक पद्धत असते, परंतु बहुतेक लोक माहिती अभावी चुकीच्या पद्धतीने चालतात, ज्यामुळे त्यांना चालण्याचे पूर्ण फायदे मिळत नाहीत.

त्यामुळे आम्ही आज तुम्हाला चालण्याची योग्य पद्धत कोणती? हे तुम्हाला सांगणार आहोत, त्यामुळे जर तुम्ही अजूनही चुकीच्या प्रकारे चालत असाल तर योग्य प्रकारे चालून शरीराला याचा फायदा होऊ द्या.

ब्रीदिंग, मॉबिलिटी आणि माइंड-बॉडी कोच डाना सँटस (Dana Santas) यांनी सांगितले की, लोक चालताना शरीराचे संतुलन सांभाळत नाहीत. ज्यामुळे त्यांच्या शरीराची स्थिती बिघडते आणि गुडघे, कंबर, पाय इत्यादींमध्ये वेदना होत असल्याच्या तक्रारी ते करतात.

बहुतेक लोक शरीराच्या एका बाजूला झुकून चालतात किंवा नेहमी बॅग हँग करण्यासाठी, मोबाईल धरण्यासाठी किंवा वस्तू उचलण्यासाठी हाताचा वापर करता, ज्यामुळे तुम्ही मोकळ्या हाताने किंवा मोकळेपणाने चालत नाही.

फिटनेस कोचच्या मते, चालताना आणि दोन्ही हात स्विंग करताना तुम्ही नेहमी शरीर सरळ ठेवावे. चालताना दोन्ही हात पुढे मागे सरकलेच पाहिजेत. पण लक्षात ठेवा की जेव्हा तुमचा एक हात समोर असेल तेव्हा दुसरा हात मागे असावा. म्हणजे दोन्ही हात एकमेकांच्या विरुद्ध दिशेने फिरले पाहिजेत. तसेच चालण्याच्या या पद्धतीसोबतच चालण्याच्या काही आणखी महत्त्वाच्या टिप्सही लक्षात घेतल्या पाहिजेत.

जसे की,1.जर तुम्हाला वॉकला जाताना मोबाईल किंवा बॅग नेण्याची सवय असेल तर चालताना, फक्त एकाच हातात बॅग किंवा मोबाईल न पकडता. दुसऱ्या हाताचा किंवा खांद्यांचा वापर थोड्या थोड्या वेळाने बॅग उचलण्यासाठी आणि मोबाईल किंवा इतर काही वस्तू उचलण्यासाठी केला पाहिजे.

2. काही महिन्यांनंतर, आपल्या शूजचे तळवे तपासा. कारण, एका बाजूला झुकून चालल्याने तुमचा एक शूज अधिक झिजतो. ज्यामुळे शरीराच्या एका बाजूला जास्त ताण पडतो. जर तुमच्या पायाचे कोणतेही शूज खूप झिजलेले असतील तर ते शूज बदला.

3. शरीराचे संतुलन सुधारण्यासाठी, तज्ज्ञ सिंगल लिंब यूनीलेटरल एक्सरसाइज (Single limb Unilateral Exercise) करण्याची शिफारस करतात. ज्यामुळे शरीराचे संतुलन सुधारते तसेच पाय मजबूत होतात.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स