हिवाळा सुरू झाल्यानंतर शरीरात उष्णता टिकवून ठेवण्यासाठी चहा कॉफी अनेकदा प्यायली जाते. तसंच कॉफी प्यायल्याने शरीराला उर्जा मिळते. काम करण्यासाठी उत्साह असतो. पण चहा किंवा कॉफी कोणत्यावेळी प्यायला हवा, हे माहीत असणं महत्वाचं असतं. कारण कोणत्याही वेळेत कॉफी घेतल्यास जीवघेण्या आजारांचा सामना करावा लागू शकतो.
अनेक जणांची सकाळ ही कॉफी प्यायल्यानंतर सुरू होते. जर चहा किंवा कॉफी घेतला नाही तर अनेकांना डोकं जड झाल्यासारख वाटतं. पण कॅफिनचं सर्वाधिक सेवन केल्याने आरोग्यासाठी घातक ठरू शकतं तसंच कॉफी योग्यवेळी घेतली नाही तर शरीरासाठी नुकसानकारक ठरू शकतं. कॅफेनचं अतिसेवन केल्याने निद्रानाश, नैराश्य, अस्वस्थता.या समस्या उद्भवण्याचा धोका जास्त असतो. त्याचप्रमाणे कॉफीचे जास्त प्रमाणात सेवन केल्यास हृदयाचे ठोके वाढणे, रक्तदाब वाढणे, डोकेदुखी यांसारख्या समस्या तीव्रतेने जाणवतात.
जर तुम्ही सकाळी उठल्याउठल्या कॉफी पित असाल तर ही सवय तुम्हाला महागात पडू शकते. असे केल्यास शरीरातील कॉर्टीसोल हार्मोनचे प्रमाण वाढते. तसंच ताण-तणावाचे प्रमाण वाढण्याची शक्यता असते. उपाशी पोटी कॉफी प्यायल्यास शरीरासाठी नुकसानकारक ठरतं. यामुळे अॅसिडीटी, अपचन आणि गॅस यांसारखे पोटाचे विकार होण्याची दाट शक्यता असते.
कॅफिन हे ऊर्जा देणार असतं. त्यामुळे जर तुम्ही व्यायाम करत असाल किंवा जीमला जात असाल तर त्याआधी कॉफी प्या. त्यामुळे मेटाबॉलिज्म बूस्टअप होईल. पण एका कपापेक्षा अधिक चहा पिणं शरीरासाठी घातक ठरू शकतं. सकाळचा नाष्ता आणि दुपारचं जेवण यांच्यामधील वेळेत तुम्ही कॉफी पिऊ शकतां कारण त्या कालावधीत थोडीफार भूक लागत असते. त्यामुळे एनर्जी येण्यासाठी तुम्ही कॉफी प्यायली तर फायदेशीर ठरेल. तसंच रात्री उशीरा कॉफी पिणं टाळा. कारण असं केल्यास अनिद्रेचा त्रास उद्भवू शकतो.