बदलत्या वातावरणात घसा खवखवणं, सर्दी कफ होण्याची समस्या उद्भवते. काही दिवसांनंतर आपोआप बरं वाटू लागतं. ही समस्या सतत होत असेल तर तुम्ही घरगुती उपाय करता तर काहीवेळा दवाखान्यात जावं लागतं. तुम्हाला माहीत आहे का सर्दी, खोकला, घसा खवखवणं ही लक्षणं टॉन्सिल्सची असू शकतात. टॉन्सलायटिसच्या समस्येवर पूर्ण माहिती असणं गरजेचं आहे. चला तर मग जाणून घेऊया काय आहे टॉन्सिलायटीसची समस्या.
टॉन्सिलायटिस एक सामान्य समस्या असून वातावरणात बदल झाल्यामुळे ही समस्या उद्भवते. टॉन्सिलायटिस या आजारात घश्यात दोन्ही बााजूंना सूज येते. ताोंडातसुद्धा प्रचंड वेदना होतात. सतत ताप येतो. या कारणांमुळे इतर आजार होण्याची शक्यता असते. . टॉन्सिलमध्ये होणारं इन्फेक्शन हे हानिकारक बॅक्टेरिया आणि व्हायरसमुळे होतं.
लक्षणं
घश्यातील वेदना
घास गिळायला त्रास होणं.
तोंडाचा खालचा भाग दुखणं.
श्वासांमधून दुर्गंधी येणं.
उपाय
टॉन्सिल आपल्या शरीरात आधीपासूनच असतो. टॉन्सिल आपल्या जिभेच्या मागच्या बाजूस असतो. जर काही कारणाने संक्रमण झालं तर यात सूज येते आणि वेदनाही होऊ लागतात. यापासून आराम मिळवण्यासाठी रोज सकाळी गरम पाण्याने गुळण्या करा.
हळद
हळदीचे फायदे तुम्हाला माहीतच असतील, एंटी- बॅक्टेरिअल, एंटी-फंगल गुण हळदीत असतात. टॉन्सिल्सच्या समस्येवर उपाय म्हणून तुम्ही हळदीचा वापर करू शकता. त्यासाठी हळद, काळं मीठ, काळी मिरी पाण्यात घालून उकळा. या पाण्याने सलग दोन- तीन दिवस गुळण्या करा. हा उपाय केल्यास तुमची समस्या लवकर दूर होईल.
मध आणि दालचिनी
मध शरीरासाठी खूप फायदेशीर ठरतं. त्यात असलेले पोषक तत्व बॅक्टेरियांना नष्ट करतात. घश्यात होणारी खवखव दूर करण्यासाठी मध आणि दालचिनीचा वापर केला जातो. त्यासाठी दालचिनी पावडर आणि मध मिसळून ३ वेळा सेवन करा. त्यामुळे टॉन्सिल्सची समस्या कमी होण्यास मदत होईल. (हे पण वाचा- गरमीत घामामुळे हैराण झालात का? या टिप्सने शरीरातील उष्णता झटपट पळवा दूर अन् म्हणा ठंडा ठंडा कूल कूल...)
हर्बल चहा
टॉन्सिल्सची समस्या घरच्याघरी दूर करण्यासाठी ग्रीन टी सुद्धा फायदेशीर ठरते. त्यासाठी ग्रीन टी मध्ये लवंग, वेलची आणि दालचीनी मिसळून हे पाणी प्या. त्यामुळे घश्यातील बॅक्टेरिया निघून जाण्यास मदत होईल. त्यामुळे किटाणू नाहिसे व्हायला मदत होते. तुम्ही आल्याचा वापर सुद्धा करू शकता. (हे पण वाचा-Coronavirus : दीड वर्षं नाही; कोरोनावरची लस 'या' महिन्यात येईल; ऑक्सफर्डच्या प्रोफेसरनं दिली खूशखबर)