दमा म्हणजेच अस्थमा हा श्वसन तंत्राशी निगडीत आजार आहे ज्यात रुग्णाला श्वास घेण्यास समस्या होते. एकदा हा आजार झाला तर यापासून नेहमीसाठी सुटका मिळवणे कठीण आहे. हा आजार होण्याचं कारण एकतर धूळ माती मानलं जातं नाही तर जेनेटिक मानलं जातं. अभिनेत्री प्रियांका चोप्राही या आजाराने ग्रस्त असल्याचं समोर आलं आहे.
प्रियांका चोप्राचं म्हणनं आहे की, तिला दमा आहे आणि यात लपवण्यासारखं काहीच नाही. प्रियांकाने सोमवारी ट्विट करुन सांगितले की, तिला यात अजिबात कमीपणा वाटत नाही की, तिला दमा आहे. मला चांगल्याप्रकारे जाणणाऱ्या लोकांना माहीत आहे की, मला दमा आहे. आणि त्यात लपवण्यासारखं काय आहे? जोपर्यंत माझ्याकडे इन्हेलर आहे तोपर्यंत दमा मला माझं लक्ष्य मिळवण्यापासून रोखू शकत नाही'.
काय आहे हा आजार?
दमा हा श्वसन तंत्राशी निगडीत आजार आहे. यात रुग्णाच्या श्वसननलिकेत सूज येते आणि यामुळे श्वास घेण्यास त्रास होतो. या कारणाने छातीत योग्य प्रमाणात ऑक्सिजन पोहोचत नाही. आणि याने श्वास भरुन येतो. हा आजार कोणत्याही वयातील व्यक्तीला होऊ शकतो. वयस्करांमध्ये हा आजार जास्त बघायला मिळतो. पण वाढत्या शहरीकरणामुळे आणि वेगवान लाइफस्टाइलमुळे लहान मुलांमध्येही हा आजार वाढताना दिसत आहे.
दम्याची लक्षणे
१) कफ असलेला खोकला किंवा कोरडा खोकला
२) छातीत भरुन आल्यासारखे होणे
३) श्वास घेण्यास त्रास होणे
४) श्वास घेताना छातीतून आवाज येणे
५) रात्री आणि सकाळी स्थिती गंभीर होणे
६) थंड्या हवेत श्वास घेतल्यावर त्रास होणे
७) व्यायाम करताना श्वास भरुन येणे
८) जोरजोरात श्वास घेणे, यामुळे थकवा येणे.
काय आहे उपचार?
onlymyhealth.com या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, वेळीच जर या आजाराची लक्षणे दिसली आणि यावर योग्य उपचार केला तर दमा किंवा अस्थमा दूर करणे शक्य आहे. दम्याची लक्षणे ओळखून वेळीच डॉक्टरांकडून उपचार करुन घ्यावा. दमा चांगला करण्यासाठी जास्तीत जास्ती केसेसमध्ये इन्हेल्ड स्टेरॉइड(नाकातून दिलं जाणारं औषध) आणि इतर अॅंटी इंफ्लामेटरी औषधे दम्यात महत्त्वाची मानली जातात. यासोबतच ब्रोंकॉडायलेटर्स श्वसननलिकेतील मांसपेशींना आराम देतं. त्यासोबतच इन्हेलरचाही उपचार म्हणून वापर केला जातो. याच्या माध्यमातून फुफ्फुसांना औषध पोहोचवण्याचं काम केलं जातं.