(Image credit- telegraphy)
कॅन्सरचा आजार हा सध्याच्या काळात जास्तीत जास्त लोकांमध्ये पसरताना दिसून येतो. याचं स्वरूप वेगवेगळ्या प्रकारचे असतं. पण तुम्हाला माहीत आहे का दैनंदिन साधं जीवन जगत असताना सुद्धा असे आजार पसरत जातात. कारण आपण रोज जाणवत असलेल्या काही समस्यांना दुर्लक्षित करत असतो. गेल्या अनेक वर्षापासून माऊथ कॅन्सरच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. २० ते २५ वर्ष वयोगटातील लोक या आजाराचे शिकार होत आहेत. आपल्या सगळ्यांनाच माहित आहे की कॅन्सर हा जीवघेणा आजार आहे.
तोंडाचा किंवा गळ्याचा कॅन्सर महिलांच्या तुलनेत पुरूषांना होत असतो. कारण मोठ्या प्रमाणावर पुरूष हे तंबाखू आणि सिगारेटचे सेवन करत असतात. आज आम्ही तुम्हाला गळ्याच्या कॅन्सरबद्दल सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया काय आहे गळ्याचा कॅन्सर.
गळ्याच्या कॅन्सरची सुरूवात तोंडापासून होते. नंतर मागच्या भागात हा आजार वाढत जातो. ज्यामध्ये तुमची जीभ आणि टॉन्सिल्सचा समावेश असतो. हा कॅन्सर थुंकीद्वारे पसरत जातो. वॉईस बॉक्स, वोकल कॉर्ड यांसारख्या तोंडाच्या अन्य भागांवर परिणाम होत असतो.
गळ्याच्या कॅन्सरची लक्षणं
अनेक दिवसांपासून आवाजात झालेला बदल
हिरड्यांमध्ये आणि दातांमध्ये सूज
गालांना गाठी येतात.
तोंडातून सतत रक्त बाहेर येते.
श्वास घ्यायला त्रास होतो.
जेवण गिळण्यासाठी त्रास होतो.
तोंडातून दुर्गंध येतो.
सतत कफ होणे.
वजन कमी होणे.
गळ्याच्या कॅन्सरची कारणं
साधारणपणे जे लोक तंबाखूचे सेवन करतात. त्यांना गळ्याचा कॅन्सर होतो. जर तुम्ही धुम्रपान किंवा तंबाखूचे सेवन करत नसाल तर या आजारापासून तुम्ही स्वतःला लांब ठेवू शकता. तंबाखूचे सेवन केल्यामुळे श्वास नलिकेवर नकारात्मक परिणांम होत असतो. त्यामुळे लाळेतुन संक्रमण झाल्यामुळे हा आजार होण्याची शक्यता असते. जर तुम्हाला गळ्याच्या कॅन्सरपासून स्वतःला वाचवायचं असेल तर तुम्ही काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे. ( हे पण वाचा-किलर लूक मिळवण्यासाठी लोक करतात रायनोप्लास्टी, 'या' सर्जरीने नेमका कसा बदलतात लूक?)
दातांना जर काही त्रास किंवा दुखण्याचा त्रास होत असेल तर तुमच्या शरीरात व्हिटामीन ए ची कमतरता असू शकते. यासोबतच जर एखादी व्यक्ती दारूचं सेवन करत असेल, धुम्रपान सुद्धा जास्त प्रमाणात करत असेल तर हा आजार कधीही उद्भवण्याची शक्यता असते. कारण अल्कोहोल आणि निकोटीन यांचे एकत्र सेवन केल्यास थ्रोट कॅन्सरचा धोका अधिक वाढत जातो. ( हे पण वाचा-पोटाच्या विकारांसह रक्ताची कमतरता दूर करण्यासाठी इफेक्टिव्ह ठरतो लसूण, जाणून घ्या कसा)