अनेकदा घरात किंवा ऑफिसमध्ये वावरत असताना आपल्याला मानसीक संतुलन बिघडल्यामुळे वेगवेगळ्या आजारांचा सामना करावा लागतो. सगळ्यात जास्त जाणवणारी समस्या म्हणजे अनेकदा आपल्याला कारण नसताना राग येत असतो किंवा चिडचिड होत असते. महिलांना अनेकदा मासिक पाळीच्या काही दिवसात राग आणि चिडचिड होण्याचा त्रास होत असतो. कारण त्यावेळी अनेक शारीरिक बदल होत असतात. पण सध्याच्या काळात कामाचा ताण असल्यामुळे कारण नसताना चिडचिड होणे हे खूपच कॉमन झालं आहे. यामुळे आजार होण्याची सुद्धा शक्यता असते.
चला तर मग जाणून घेऊया मानसीक स्थिती सतत बिघडलेली असेल तर आरोग्यावर काय परिणाम घडून येतो. याविषयी एक संशोधन करण्यात आले होते त्यानुसार चिडचिड आणि राग ज्यांना येतो. असे लोकं घरात किंवा ऑफिसमध्ये जास्तवेळ बसून काम करणारे होते. त्यामुळे त्यांना जास्त थकवा, शरिर सुजल्यासारख वाटणे, मानसिक ताण-तणाव वाढणे ही एकमेकांशी निगडीत असलेली लक्षणं जाणवत होती. या आजाराला बर्न आऊट असं म्हणतात.
(image credit- unsplash)
सर्वसाधारणपणे हा प्रकार डिप्रेशन सारखा वाटत असतो. पण डिप्रेशन हे वेगळ्या प्रकारचे असते. कारण ग्रासलेला व्यक्ती नेहमी आत्मविश्वासाची कमतरता आणि भावना विरहीत वावरत असतो. त्यामुळे सायकॉलॉजिकल ताण वाढण्यासोबतच हार्ट टिश्यूज हे खराब होत असतात. यामुळे हद्याचे थोके सुद्धा कमी होण्याची शक्यता असते.
मानसिक स्थितीत बदल झाल्यामुळे आजार होण्याची शक्यता असते. तसंच ब्लड क्लॉट्स आणि हार्ट फेल्यूअर अशा समस्या उद्भवू शकतात. ज्यांचा तुम्ही विचार सुद्धा करू शकतं नाही. वर्ल्ड ट्रेड ऑर्गनाईजेशनच्या मते महिला आणि पुरूष दोन्ही ऑफिसचं काम सुद्धा करत असल्यामुळे त्यांन बर्न आऊट होण्याची शक्यता जास्त असते. बर्न आऊट या आजाराची लक्षणं पुढिलप्रमाणे आहेत.
शरीर थकलेलं वाटणे.
काही वेळ काम केल्यानंतर शरीरात एनर्जी कमी झाल्यासारखं वाटणे,
काम करत असताना कामात लक्ष नसणे
डोक्यात नेहमी नकारात्मक विचार असणे.