शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपा अध्यक्ष असताना अमित शाहांना वाट बघायला लावायचे नितीन गडकरी?; स्वत: केला खुलासा
2
मोठी बातमी: मविआतील तिढा सुटला?; काँग्रेस १०० जागा लढणार, ठाकरे-पवारांच्या वाट्याला किती?
3
"मुंबई विद्यापीठाचा कारभार म्हणजे 'फक्त' रात्रीस खेळ चाले"; पुन्हा सिनेट निवडणूक रद्द
4
इस्त्रायल लेबनानच्या 'पेजर' स्फोटात भारताचं कनेक्शन; केंद्रीय तपास यंत्रणा अलर्ट
5
PPF vs NPS : तुमच्या मुलांसाठी कोणती स्कीम बेस्ट; कशात मिळेल जास्त रिटर्न? जाणून घ्या डिटेल्स
6
"ओए... सोए हुए हैं सब लोग..!" कॅप्टन रोहित झाला 'अँग्री यंग मॅन'; सगळं स्टंप माइकमध्ये झालं रेकॉर्ड (VIDEO)
7
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
8
सलमान खानने संगीता बिजलानीला दिला धोका, या अभिनेत्रीसोबत अभिनेत्याला पकडलं होतं रंगेहाथ, इतक्या वर्षांनंतर झाला खुलासा
9
VIDEO: PM मोदींच्या वाढदिवसानिमित्त खोटं खोटं रक्तदान; फोटो काढून निघून गेले भाजपचे महापौर
10
डीके शिवकुमारांची खेळी, JDS ला मोठा धक्का; पोटनिवडणुकीपूर्वी १३ नेत्यांनी साथ सोडली
11
Pitru Paksha 2024: विशेषतः पितृपर्वात त्र्यंबकेश्वर येथे जाऊन का केली जाते कालसर्प शांती? वाचा
12
तिरुपतीच्या लाडूंच्या विक्रीतून वर्षांला ५०० कोटींचा महसूल; पाहा किती जुना आहे 'मिठा प्रसादम'चा इतिहास
13
शंभुराज देसाईंचा मध्यरात्री फोन अन् मनोज जरांगेंनी घेतले सलाईनद्वारे उपचार
14
जबरदस्त क्रेझ... दर तीन मिनिटांना एका iPhone 16 ची विक्री; Blinkit आणि BigBasket वरही ग्राहकांची रांग
15
"५० खोक्यांचा मुकूट, विरोधी पक्ष फोडाया बुद्धी..."; नवरा माझा नवसाचा २ च्या भारूडाची जोरदार चर्चा
16
"राजकारण असा धंदा जिथे सामान्यांच्या शिव्या..."; देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली भावना
17
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
18
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
19
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
20
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप

लिव्हर सिसोरिसच्या 'या' लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास ओढावू शकतो मृत्यू, आत्ताच घ्या जाणून

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2021 2:39 PM

आजकाल लिव्हर सिसोरिसचं प्रमाण वाढत आहे.आपल्या नियमित जीवनातील काही वाईट सवयींमुळे यकृताचे कार्य बिघडते. परिणामी आरोग्यावर काय परिणाम होतो हे तुम्हांला ठाऊक आहे का ?

यकृत हा आपल्या शरीराचा अत्यंत महत्त्वाचा अवयव आहे. यकृतामुळे शरीराचे पचन सुरळीत राहण्यास मदत होते. सोबतच शरीरात पित्ताचं प्रमाण संतुलित ठेवणं, रक्त स्वच्छ ठेवणं, शरीरातील टाकाऊ पदार्थ बाहेर टाकण्यास मदत होते. पण आपल्या नियमित जीवनातील काही वाईट सवयींमुळे यकृताचे कार्य बिघडते. परिणामी आरोग्यावर काय परिणाम होतो हे तुम्हांला ठाऊक आहे का ? 

यकृताच्या आरोग्यावर परिणाम झाल्यानंतर संबंधित टिश्यू खराब होतात. हळूहळू यकृताशी निगडीत अनेक समस्या वाढायला सुरूवात होते. यामध्ये लिव्हर कॅन्सर, लिव्हर अ‍ॅबसेस,फॅटी लिव्हर, लिव्हर सिरोसिसचा त्रास जडू शकतो. आजकाल लिव्हर सिसोरिसचं प्रमाण वाढत आहे. 

लिव्हर सिरोसिस म्हणजे काय ?कॅन्सरनंतर सगळ्यात गंभीर आजार म्हणजे लिव्हर सिरोसिस. लिव्हर सिरॉसिसच्या शेवटच्या टप्प्यात त्यामधून बचावण्याचा एक मार्ग म्हणजे यकृताचं प्रत्यारोपण. जेव्हा यकृताचे टिश्युज नष्ट होतात तेव्हा ही समस्या जडायला सुरूवात होते. यामध्ये लिव्हरचा आकार असामान्य होण्यास सुरूवात होते. अशा परिस्थितीमध्ये पोर्टल हायपरटेंशन वाढण्यास सुरूवात होते. 

लिव्हर सिरोसिसचे तीन टप्पे लिव्हर सिरोसिसचा आजार हा तीन टप्प्यांमध्ये वाढतो. प्रत्येक टप्प्यामध्ये वेगवेगळी लक्षण आढळतात.  

पहिला टप्पालिव्हर सिरॉसीसमध्ये पहिल्या टप्प्यात वजन कमी होणं, थकवा जाणवनं, पचन बिघडणं अशा समस्या जाणवतात. 

दुसरा टप्पा उलटी होणं, भूक मंदावणं, ताप येणं, चक्कर येणं  

अंतिम आणि तिसरा टप्पा अंतिम टप्प्यात अनेकदा रक्ताची उलटी होणं, लहानशा जखमेतूनही भळाभळा रक्तप्रवाह होणं, शुद्ध हरपणं अशी लक्षणं दिसतात. लिव्हर सिरोसिसच्या या टप्प्यात यकृत प्रत्यारोपणाशिवाय इतर पर्याय नाही.

लिव्हर सिरोसिसची कारणं

  • लीवर सिरोसिस हा आजार होण्याची अनेक कारणं आहेत. यात मद्यपान, हेपिटायटिस बी आणि सी याशिवायही अनेक कारणं आहेत.
  • यकृतातील चरबीचे प्रमाण अति होणे
  • काही औषधे  अति काळ सेवन केल्याने सिरॉसिस होऊ शकतो.
  • जन्मजात लिव्हरमधील दोष- पित्त नलिकेत जन्मजात अडथळा असेल तर सिरॉसिस होऊ शकतो.
  • लठ्ठपणा 
  • मधूमेह 

लिव्हर सिरोसिसची लक्षणेया आजारामुळे शरीरात नेहमी थकवा जाणवत असतो. तसेच भूक कमी लागते आणि त्वचेचा रंग फिकट पिवळा होऊ लागतो. कावीळ होते, खाज येणं, लठ्ठपणा आणि त्वचेचा रंग निळाही (bruising) होऊ शकतो.  लीवर सिरोसिसमुळे पोटात, जांघेत, पायात आणि टाचात सतत सूज आल्यासारखं वाटतं. यासोबतच यात varices समस्याही निर्माण होतात. यात नसांमध्ये सूज येते आणि रक्ताभिसरण सुरळीत होत नाही. लीवर बायोप्सीच्या (liver biopsy) मदतीने सिरोसिस आजाराचं निदान होतं. यात रुग्णाचा वैद्यकिय इतिहास, रक्ताची चाचणी याच्या आधारावर सिरोसिसचं निदान करता येतं.

कसा टाळाल धोका? 

लिव्हर सोरासिसचा धोका टाळायचा असेल तर खाण्या-पिण्यासोबतच तुमच्या जीवनशैलीमध्ये सकारात्मक बदल करा. दारू किंवा सिगारेटचं व्यसन असल्यास त्याचा मोह टाळा. आहारात गाजर, फळं, शिंगाडा, दूध, सोयाबिनचा समावेश करा. संतुलित आणि पोषक आहाराचा समावेश केल्यास यकृताचं आरोग्य जपण्यास मदत होते. वरील लक्षणे आढळल्यास वेळ न दवडता डॉक्टरचा सल्ला घ्या.

 

 

 

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सcancerकर्करोग