शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: MS Dhoni चा 'भिडू' Mumbai Indians ने पळवला; दीपक चहरसाठी मोजले किती कोटी? जाणून घ्या
2
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
3
मतमोजणीच्या आकडेवारीत घोळ? व्हायरल पोस्टचे सत्य समोर, निवडणूक अधिकारी म्हणाले...
4
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
5
IPL Auction 2025: भुवीसाठी MI अन् LSG यांच्यात 'बोली युद्ध'; होऊ दे खर्च म्हणत शेवटी RCB नं मारली बाजी
6
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले
7
मी ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने कसा जिंकलो..? जितेंद्र आव्हाडांनी सांगितला १ ऑगस्टपासूनचा EVM चा घटनाक्रम
8
फडणवीस मुख्यमंत्री झाले तर भाजपकडे शिंदेंसाठी प्लॅन 'B'? ठरू शकतो असा फॉर्म्युला 
9
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सला इशान किशनचा पर्याय सापडला! कोण आहे त्याची जागा घेणारा रायन रिकल्टन?
10
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
11
"चांगल्या घरातल्या मुली...", मनिषा कोईरालाच्या पदार्पणावर विचारले गेले होते प्रश्न; म्हणाली...
12
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
13
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
14
द्रविडच्या RR नं दिला MS धोनीच्या CSK ला शह! कल्याणकर Tushar Deshpande चं 'कल्याण'
15
मल्लिका शेरावतचं फ्रेंच बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप! म्हणाली, "आजच्या काळात योग्य व्यक्ती शोधणं..."
16
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
17
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
18
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
19
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
20
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...

गरम आणि मिठाचं पाणी पिण्याचे आरोग्यदायी फायदे वाचाल तर दवाखान्याचा रस्ता विसराल...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2022 11:50 AM

Hot and Salt Water Benefits : अनेकांना वेगवेगळ्या आजारांचा सामना करावा लागतो. त्यामुळेच आम्ही तुमच्यासाठी काही हेल्दी आणि फिट राहण्याच्या टीप्स घेऊन आलो आहोत. 

Hot and Salt Water Benefits : पाण्याशिवाय जगणं शक्य हे नाही सर्वांनाच माहीत आहे. पाणी आपली तहान भागवण्यासोबतच शरीराच्या विकासात अनेक महत्वाच्या भूमिकाही बजावतं. पण अलिकडे धावपळीच्या जीवनात, कामाच्या ओझ्यामुळे प्रत्येकाला आरोग्य हेल्दी आणि फिट ठेवणं शक्य होत नाही. अनेकांना वेगवेगळ्या आजारांचा सामना करावा लागतो. त्यामुळेच आम्ही तुमच्यासाठी काही हेल्दी आणि फिट राहण्याच्या टीप्स घेऊन आलो आहोत. 

1) ऊर्जा वाढवणं आणि थकवा दूर करणं

आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी आणि ताजंतवाणं राहण्यासाठी दररोज योग्य प्रमाणात पाणी पिणे गरजेचं आहे. योग्य प्रमाणात पाणी पिल्याने तुम्हाला विचार करण्यासाठी, लक्ष केंद्रीत करण्यासाठी आणि तरतरीत राहण्यासाठी मदत मिळते. त्यासोबतच योग्य प्रमाणात पाणी पिल्याने तुमच्या ऊर्जेतही वाढ होत राहाते.

2) वजन कमी करण्यात मदत

वजन वाढण्याचं सर्वात मोठं कारण म्हणजे दिवसभर काहीना काही खात रहाणं हे आहे. जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर, त्यासाठी तुम्हाला योग्य प्रमाणात पाणी प्यावं लागेल. त्यामुळे तुम्हाला भूक कमी करण्यास मदत मिळते. 

3) इम्युनिटी सिस्टम होतं मजबूत

तुम्ही जितकं जास्त पाणी पिणार तितकं तुमचं आरोग्य चांगलं राहणार. पाण्यामुळे तुमचं इम्युनिटी सिस्टम मजबूत राहतं आणि याने तुम्हाला कॅंसर आणि इतरही रोगांपासून लढण्याची ताकद मिळते. 

4) शरीरातील टॉक्सीन बाहेर पडतं

योग्य प्रमाणात पाणी प्यायल्याने घाम आणि लघवीच्या माध्यामातून शरीरातील टॉक्सीन बाहेर पडतं. यामुळे किडनी स्टोनसारख्या समस्या होणार नाहीत. 

मिठाचं पाणी पिण्याचे फायदे

1) पचनक्रिया चांगली राहते

मिठाचं पाणी प्यायल्याने तोंडातील लाळ ग्रंथी सक्रीय होतात. त्यामुळे पचनक्रिया संतुलित राहते. 

2) वजन कमी करण्यास मदत

काळं मिठ घातलेलं कोमट पाणी प्यायल्यास तुमच्या शरीरातील एक्स्ट्रा फॅट कमी होतात. याने तुमचं वाढलेलं वजन कमी होण्यास मदत होते. यासोबतच तुमच्या शरीरातील कोलेस्ट्रॉल लेव्हल कमी होतात. कोलेस्ट्रॉल कमी झाल्याने डायबिटीससारखे आजार होण्याची शक्यता कमी असते. 

3) चांगली झोप लागण्यास मदत

मीठ रक्तात कॉर्टिसोल आणि एड्रनिल वाढवण्यासाठी मदत करतं. या दोन्ही गोष्टी हार्मोन्स स्ट्रेससोबत डील करतात. हे हार्मोन्स मॅनेज केल्यास झोप चांगली येते. त्यामुळे जर तुम्हाला झोपेचा त्रास होत असेल तर रोज सकाळी मिठ घातलेलं पाणी सेवन करा.

4) बॅक्टेरियाचा सफाया

मिठाच्या पाण्यात मोठ्या प्रमाणात मिनरल्स असतात. त्यामुळे मिठाचं पाणी अ‍ॅंटी बॅक्टेरिअल सारखं काम करतं. याने तुमच्या शरीरात रोगराई पसरवणारे बॅक्टेरिया मारले जातात आणि तुमचं आरोग्य चांगलं राहतं. 

गरम पाणी पिण्याचे फायदे

1) सकाळी लवकर उठून गरम पाणी पिल्याने पचनक्रिया संतुलित राहते. जेवण लवकर आणि सहज पचतं.

2) सकाळी कोमट पाणी पिल्याने शरीराचं वजन नियंत्रित राहतं. यामुळे शरीरातील तापमान वाढण्यासही मदत मिळते.

3) आजकाल वेळेच्याआधीच म्हातारपण येताना बघायला मिळतं. जर तुम्हालाही वयाच्या आधीच म्हातारप नको असेल तर सकाळी उठून रोज गरम पाणी नक्की प्यावे. 

4) रोज सकाळी गरम पाणी प्यायल्याने कफ, वात आणि पित्तसारख्या समस्याही होत नाहीत.

5) गरम पाणी त्वचेसाठी रामबाण उपाय आहे. गरम पाण्यामुळे त्वचेसंबंधी अनेक समस्यांपासून सुटका मिळते.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य