शहरं
Join us  
Trending Stories
1
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
2
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
3
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
5
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
6
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
7
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
8
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
9
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
10
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
11
अमेरिकेत भेटलेल्या तरुणाच्या घरी पहाटेच पोहोचले राहुल गांधी; भारतातील बेरोजगारीला कंटाळून तरुणाने अमेरिकेत केली होती घुसखोरी
12
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
13
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
14
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
15
आयटीवाल्यांना पुढील वर्षी भरभरून पगारवाढ नाहीच; आघाडीच्या कंपन्या देणार ५ ते ८ टक्के वाढ
16
सणासुदीच्या तोंडावर तेल महागाईची चाहूल; अनेक जीवनावश्यक वस्तू चढ्या दराने
17
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
18
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
19
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
20
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी

हे आहेत हृदय कमजोर झाल्याचे संकेत, आजारांपासून वाचायचं असेल तर वेळीच व्हा सावध

By ऑनलाइन लोकमत | Published: September 05, 2022 2:19 PM

Heart Problem : धक्कादायक बाब म्हणजे गेल्या काही वर्षात भारतात 18 ते 30 वयोगटातील तरूणांना हार्ट डिजीजने ग्रासलं आहे. ज्यामुळे त्यांना आपला जीव गमवावा लागत आहे.

Heart Problem : सरकारी हेल्थ एजन्सी सेंटर फॉर डिजीज कंट्रोल अॅन्ड प्रिव्हेंशननुसार, जगभरात हृदयरोगाने दरवर्षी लाखो महिला आणि पुरूषांचा जीव जातो. या मृत्यूंच एक मुख्य कारण आहे. भारतातही ही आकडेवारी फार जास्त आहे. एका रिपोर्टनुसार, देशात दरवर्षी कार्डिओवस्कुलर डिजीजच्या रूग्णांची संख्या वाढत आहे आणि मृत्यूच्या दरातही वाढ होत आहे. धक्कादायक बाब म्हणजे गेल्या काही वर्षात भारतात 18 ते 30 वयोगटातील तरूणांना हार्ट डिजीजने ग्रासलं आहे. ज्यामुळे त्यांना आपला जीव गमवावा लागत आहे.

हृदयरोगाची समस्या जास्तीत जास्त केसेसमध्ये खराब जीवनशैलीमुळे होत असते. धुम्रपान, मद्यसेवन जास्त करणे आणि व्यायाम अजिबात न करणे याने हा धोका वाढतो. अमेरिकन हार्ट असोसिएशननुसार, 80 टक्के हृदयरोगांपासून बचाव केला जाऊ शकतो. यासाठी तुम्हाला केवळ त्या संकेतांना ओळखायचं आहे ज्यामुळे हृदयाला समस्या होतात. यानंतर तुम्ही तुमच्या इतर शरीराप्रमाणे हृदयाचीही काळजी घेऊ शकाल.

आजाराआधी हृदय देतं हे संकेत

फ्लोरिडाच्या डेलरे मेडिकल सेंटरमधील कार्डिोथेरसिक सर्जरीचे मेडिकल डायरेक्टर डॉ. जेफरी न्यूमॅन यांच्यानुसार, सामान्यपणे तुमच्या हृदयाचं आरोग्य इजेक्शन फ्रॅक्शनच्या माध्यमातून मोजलं जातं. एका सामान्य इजेक्शन फ्रॅक्शन 55 किंवा 60 टक्के असतं. ज्याचा अर्थ असा होतो की, हृदयात जेवढा ब्लड फ्लो होत आहे त्याच्या साठ टक्के सहजपणे बाहेर पंप होत आहे. याला एका निरोगी योग्यप्रकारे काम करणारं हृदय मानलं जातं.

तेच जेव्हा तुमचं हृदय कमजोर होऊ लागतं तेव्हा तुम्हाला हार्ट अटॅक येतो किंवा तुम्हाला एखादा वॉलकुलर आजार होता. तेव्हा हृदयाचं इजेक्शन फ्रॅक्शन कमी होतं. जर एखाद्या रूग्णाच्या हृदयाचं इजेक्शन फ्रॅक्शन 30 टक्के असेल तर याचा अर्थ रूग्णाचं हृदय योग्यप्रकारे काम करत नाहीये. या समस्येमुळे पुढे जाऊ हार्ट फेल होऊ शकतो. कोणत्याही व्यक्तीच्या हृदयाचं इजेक्शन फ्रॅक्शन जेवढं कमी होईल,  त्याना तेवढाच हार्ट फेल आणि कार्डियाक अरेस्टचा धोका होईल.

कसा कमी कराल धोका?

डॉ. न्यूमॅन यांनी सांगितलं की, 'सामान्यपणे लोक आपल्या आरोग्याबाबत काळजी करतात. पण ते त्यांच्या हृदयाच्या आरोगय्याबाबत तेवढे जागरूक नसतात. ते या समस्यांकडे दुर्लक्ष करतात. चुकीच्या खाण्या-पिण्याच्या सवयी, लठ्ठपणा, व्यायाम न करणे, आळस किंवा कोणतीही शारीरिक मेहनत न करणे या सवयी वाईट प्रभाव पाडतात. हृदयाचं आरोग्य जास्तीत जास्त आपल्या लाइफस्टाईलवर अवलंबून आहे. लाइफस्टाईल सुधारून तुम्ही हे धोके कमी करू शकता. आमच्याकडे असे अनेक रूग्ण येतात ज्यांचा डायबिटीस वाढलेला असतो किंवा ब्लड शुगर कंट्रोल अनियंत्रित झाला असतो.यासोबतच ते स्मोकिंग किंवा कोणतीही फिजिकल अॅक्टिविटी करत नाहीत. वय वाढण्यासोबतच ते आरोग्याकडे दुर्लक्ष करू लागतात. यानंतर ते जसेही 50, 60 किंवा 70 वयाचे होतात त्यांचं शरीर बिघडू लागतं. मी हे नाही म्हणत की, तुम्ही नेहमीसाठी जिवंत राहाल. पण तुम्ही स्वत:ची काळजी घेऊन जीवन चांगलं करू शकता.

श्वास घेण्यास त्रास

डॉक्टरांनी सांगितलं की, 'तुम्हाला जर बेडरूमपासून किचनपर्यंत जाताना दम लागत असेल आणि तुम्हाला जर एखाद्या ठिकाणी थांबून श्वास घ्यावा लागत असेल तर हा संकेत आहे की, तुमचं हृदय कमजोर झालं आहे. हा एक सुरूवातीचा संकेत आहे. या स्थितीत हृदय योग्यप्रकारे ब्लड फ्लो करत नाही. छातीत वेदना होणे हार्ट डिजीजचं लक्षण

जर तुम्ही घरातल्या घरात चालताना तुमच्या छातीत वेदना होत असेल. आणि तुम्ही एका जागी बसत असाल आणि थोडा आराम करून तुम्हाला बरं वाटत असेल तर हे  हृदयरोगचं लक्षण आहे.

- पुन्हा पुन्हा तुम्ही बेशुद्ध होत असाल किंवा चक्कर येत असेल तर याकडे दुर्लक्ष करू नका.

- जर तुम्ही सतत बेशुद्ध होत असाल तर तुम्हाला वॉल्वुलर हार्ट प्रॉब्लेम असू शकतो. जर काम करताना चक्कर येत असेल किंवा तुम्ही बेशुद्ध होत असाल तर हे धोकादायक आहे.

टॅग्स :Heart Attackहृदयविकाराचा झटकाHeart Diseaseहृदयरोग