सध्याच्या जीवनशैलीमुळे हृदयरोगाचे प्रमाण वाढते आहे. विशेष म्हणजे यात तरुण मंडळींचाही समावेश आहे. वास्तविक, बऱ्याच लोकांना हृदयविकाराचा झटका येण्याची सुरुवातीची लक्षणे समजत नाहीत आणि रूग्णालयात नेईपर्यंत जीव वाचवण्याइतके प्राथमिक उपचार त्यांना मिळत नाहीत. यामुळे, बर्याच वेळा रुग्णालयात पोहोचेपर्यंत रुग्णाची प्रकृती गंभीर बनते आणि कधीकधी मृत्यू देखील होऊ शकतो. आपल्या कुटूंबाला कोणत्याही प्रकारच्या अनुचित घटनेपासून वाचवण्यासाठी हृदयविकाराच्या झटक्याची लक्षणे आणि प्रथमोपचार संबंधित आवश्यक माहिती जाणून घेतलीच पाहिजे.
'ही' असू शकतात लक्षणे:छातीत जडपणा किंवा तीव्र वेदना, छातीत दुखणे, हात, जबडा, मान, पाठ आणि ओटीपोटात दुखणे, घाम येणे, चक्कर येणे किंवा चिंताग्रस्त होणे, श्वास लागणे, मळमळणे आणि खोकला येणे, श्वास घेण्यास त्रास होणे, अशक्तपणा वाटणे इत्यादी लक्षणे दिसू शकतात. मात्र कधीकधी वेदना खूपच जोरात होतात, तर कधीकधी सौम्य असतात किंवा जाणवतच नाहीत. परंतु, इतर लक्षणांसह आपण त्याचा आधीच अंदाज लावू शकता.
हृदयविकाराचा झटका आला तरहृदयविकाराचा झटका जर कुणाला आला तर अजिबात घाबरून न जाता हे पाच उपाय जर केले तर तुम्ही रुग्णाचा जीव वाचू शकता. महत्वाची गोष्टी म्हणजे रुग्णवाहिका ताबडतोब बोलवा. बहुतांश रुग्णवाहिकांमध्ये सर्व सुविधा उपलब्ध राहत असल्यामुळे रुग्णावर ताबडतोब उपचार सुरू केले जाऊ शकतात.हृदयविकाराचा झटका आल्यानंतर रुग्णाला मळमळते. त्या रुग्णाला अशावेळेस एका कडेवर वळवा. त्याला असे केल्याने मोकळा श्वास घेता आल्याने त्याची तीव्रता कमी होते. तसेच फुप्फुसांना नुकसान होत नाही. त्याचा पल्स रेट चेक करा. तो जर ६० ते ७० पेक्षा जास्त असेल तर रक्तदाब झपाट्याने वाढतो आणि रुग्णाची प्रकृती नाजूक आहे असे समजून तात्काळ रुग्णालयात हलवा.पल्स रेट कमी जास्त होत असेल तर रुग्णाला झोपवून त्याचे पाय वर उचला. यामुळे पायाकडील रक्तप्रवाह त्याच्या हृदयाकडे वळतो. असे केल्याने त्याला बऱ्यापैकी आराम मिळतो. रुग्णाला झोपवल्यानंतर त्याचे कपडे जरा सैल करा. अशा परिस्थितीत त्याला जास्त हालचाल करायला लावू नये. रुग्णाने गाडी चालवता कामा नये, तसेच जिने चढणे-उतरणे टाळावे. असे काही घडत असेल तर रुग्णाभोवती जास्त गर्दी होणार नाही याची काळजी घ्या. पुरेशी हवा त्याला मिळेल नीट श्वास घेता येईल येची काळजी घ्या. अॅस्पिरीन किंवा सॉरबिट्रेट यापैकी कोणतिही एक गोळी रुग्णाला द्यावी.