अनेजणांनी बालपणी सायकल चालवली असेल पण आता कुणीही फारसं सायकल चालवण्याबाबत सिरिअस दिसत नाही. पण आजच्या धकाधकीच्या जीवनात आरोग्या चांगलं ठेवणं मोठं आव्हानच आहे. अशात वेगवेगळ्या देशांमध्ये सायकल चालवण्यावर भर दिला जात आहे. सायकल चालवण्याचे फायदे तुम्हाला माहिती पडल्यास तुम्हीही बाईक सोडून सायकलच्या प्रेमात पडाल. चला सायकल चालवण्याचे 7 फायदे जाणून घेऊया.
* जास्त काळ दिसणार तरूण
जिमसाठी जास्त वेळ देऊ शकत नसाल तर काही तास सायकाल चालवल्याने ब्लड सेल्स आणि स्किनमध्ये ऑक्सीजनचा पुरेसा प्रवाह होत असल्याने त्वचा जास्त चांगली आणि चमकदार दिसते. म्हणजे तुमच्या वयाच्या लोकांपेक्षा तुम्ही जास्त तरुण दिसाल. असे आम्ही सांगत नाहीतर अमेरिकेतील स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीतील अनेक दिवसांच्या रिसर्चमधून समोर आले आहे.
* रात्री येईल चांगली झोप
जर तुम्ही सकाळी सकाळी काही वेळ सायकल चालवली, तर तुम्हाला रात्री मस्त झोप लागेल. म्हणजे झोप न येण्याची समस्या दूर होईल.
* चांगलं आरोग्य
युनिव्हर्सिटी ऑफ कॅरोलाईनमध्ये रिसर्चमधून समोर आले की, जे लोक आठवड्यातून कमीत कमी पाच दिवस साधारण अर्धा तास सायकल चालवतात, त्यांच्या शरीरातील इम्यून सेल्स जास्त अॅक्टिव्ह राहतात आणि ते व्यक्ती एक्सरसाइज न करणाऱ्या कोणत्याही दुस-या व्यक्तीपेक्षा ५० टक्के कमी आजारी पडतात.
* फिजीकल रिलेशन अधिक चांगले होईल
सायकलिंग केल्याने बॉडीचे सर्वच मसल्स हेल्दी आणि मजबूत होतात. ज्याने तुमची सेक्सश्युअल पॉवर वाढते. कॉरनेल युनिव्हर्सिटीतील एका रिसर्चमधून समोर आले आहे की, रोज काही वेळ सायकल चालवणारे पुरूष किंवा महिला त्यांच्याच वयाच्या दुस-या लोकांपेक्षा सेक्स लाईफचा अधिक आनंद घेऊ शकतात.
* ब्रेन पॉवर वाढेल
सायकल चालवणा-यांची ब्रेन पॉवर सायकल न चालवणा-यांच्या तुलनेत १५ टक्के जास्त असते. अमेरिकेच्या इलिनॉय युनिव्हर्सिटीचे प्रोफेसरने अभ्यासातून निष्कर्ष काढला की, सायकल चालवल्याने तुमचं हृदय मजबूत राहतं. शिवाय यामुळे तुमच्या शरिरात ब्रेन सेल्सही वाढतात.
* आनंदाने खा हाय कॅलरी स्नॅक्स
ज्या लोकांना समोसे, कचोरी, कोल्ड्रींक किंवा दुसरे हाय कॅलरी स्नॅक्स खाणे पसंत आहे. पण हे जास्त खाल्ल्याने मिळालेली एक्स्ट्रा कॅलरी घटवणे त्यांच्यासाठी कठिण आहे. अशात सायकलिंग करून तुम्ही तुमच्यात वाढलेली एक्स्ट्रा कॅलरी कमी करू शकता.
* वाढलेलं पोट करा कमी
सायकलिंगने तुम्ही तुमचं वाढलेलं वजन कंट्रोलमध्ये ठेवू शकता. एका ब्रिटीश अभ्यासकाने दावा केलाय की, जर तुम्ही रोक कमीत कमी अर्धा तास सायकल चालवली तर वर्षभरात तुमचं ५ किलो वजन कमी होतं. किंवा असे म्हणूया की, सायकल चालवल्याने तुमचं शरिर जास्त वजन गेन करणार नाही.