व्हजायनामध्ये इरिटेशन, स्वेलिंग किंवा इन्फेक्शन होणं एक साधारण गोष्ट आहे. अनेक महिलांना या समस्यांचा सामना करावा लागतो. परंतु, तुम्हाला या समस्या उद्भवण्यामागे आपल्या दैनंदिन जीवनातील काही गोष्टीं कारणीभूत ठरतात. जाणून घेऊया अशी काही कारणं आणि लक्षणं जी व्हजायनल इन्फेक्शनसाठी कारणीभूत ठरतात.
या वयामध्ये असतो अधिक धोका
महिलांमध्ये व्हजायनल बॅक्टेरियल इन्फेक्शन सर्वात अधिक 25 ते 35 वयामध्ये असतं. यादरम्यान व्हजायनामध्ये इचिंग होण्यासोबतच यल्लो किंवा ग्रे डिस्चार्ज होऊ शकतो. हा डिस्चार्ज एखाद्या पेस्टप्रमाणे घट्ट किंवा पाण्याच्या स्वरूपातही असू शकतो. जर तुम्हाला अशाप्रकारच्या कोणत्या समस्यांचा सामना करावा लागत असेल तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं.
ही आहेत लक्षणं...
जर बॅक्टेरियल इन्फेक्शन तुमच्या यूरिन सिस्टमच्या एखाद्या भागामध्ये झालं असेल तर याच्या लक्षणांच्या रूपामध्ये तुम्हाला पेल्विकमध्ये वेदना, यूरिन पास करताना वेदना होणं, व्हजायनामध्ये जळजळ आणि व्हजायनल स्मेल सारख्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. या इन्फेक्शनला वैद्यकिय भाषेमध्ये यूटीआय इन्फेक्शनच्या नावाने ओळखलं जातं. जर यांपैकी कोणतही लक्षणं तुमच्यामध्ये दिसत असेल तर स्त्रीरोग तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं.
सर्वात मोठं कारण
जर शारीरिक संबंध ठेवताना तुम्ही हायजीनवर लक्षं देत नसाल तर तुम्हाला क्लॅमाइडिया, ट्रायकोमोनिएसिस, गोनोरिया, व्हजायनाच्या आजूबाजूच्या त्वचेवर खाज येणं आणि सेक्सुअली ट्रान्समिटेड डिजीज यांसारख्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. यामुळे व्हजायनामध्ये वेदना होणं, खाज येणं आणि जळजळ यांसारख्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे इंटिमेच हायजीनची काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे.
जर इंटरकोर्सआधी इंटिमेट बॉडी पार्ट्सच्या हायजीनची काळजी घेतली नाही तर Vaginal Infection होण्याचा धोका वाढतो. अनेक रिसर्चमधून ही गोष्ट सिद्ध झाली आहे की, अनेक महिलांमध्ये व्हजायनल इन्फेक्शनची समस्या हायजीनच्या कमतरतेमुळे उद्भवते.
(टिप : वरील सर्व समस्या आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं.)