शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटक आर्थिक संकटात! जेवढी द्यायची ऐपत, तेवढीच आश्वासने द्या...; खर्गेंनी महाराष्ट्रावरून नेत्यांचे कान टोचले
2
पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेच्या अध्यक्षांचे निधन; मोदींकडून शोक व्यक्त
3
ई-स्कूटर घ्या; पण तक्रारींचे काय? कंपन्यांविराेधात १२ हजार तक्रारी, केंद्र सरकार करणार चाैकशी
4
शरद पवारांच्या भेटीसाठी बारामतीत मोठी गर्दी; गोविंदबागेत उभे रहायलाही जागा नाही...
5
आधी बारावी, मग नववी; अस्लम शेख यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप, विनोद शेलार कोर्टात जाणार  
6
भेटायला आले, नमस्कार केला अन् गोळ्या झाडल्या; दिवाळी साजरी करणाऱ्या काका-पुतण्याची हत्या
7
मनसे कार्यकर्त्यांनी मनसेच्या उमेदवाराचेच कार्यालय फोडले; अकोल्यात मोठा राडा, नेमके काय घडले...
8
अर्जुन कपूरने ब्रेकअप झाल्याचं सांगताच मलायकाची पोस्ट, म्हणते - "एका क्षणासाठी..."
9
मी कुठे सांगतो माझा प्रचार करा, विरोध अपेक्षितच; नवाब मलिक भाजप नेत्यांवर कडाडले
10
HDFC Bankची उपकंपनी HDB फायनान्शिअल सर्व्हिसेस आणणार IPO; 'इतके' हजार कोटी उभे करणार
11
'सिंघम अगेन'च्या शेवटी मिळालं खास सरप्राइज! सलमान खानच्या एन्ट्रीने झाली नव्या सिनेमाची घोषणा
12
भारतात 2050 पर्यंत मुस्लीम लोकसंख्येत मोठी वाढ होणार, 'या' 3 देशांत हिंदू जवळपास 'संपुष्टात' येणार!
13
'विराट' विक्रम मोडला! इथं पाहा IPL च्या इतिहासातील Expensive Retained Players ची यादी
14
ऐन दिवाळीत नेते बंडोबांना थंडोबा करण्याच्या मोहिमेवर; महायुती, महाआघाडीसाठी पुढील ४ दिवस वाटाघाटीचे
15
प्रियांका गांधींनी गुंतवलेल्या Mutual Fund नं किती दिले रिटर्न? तुमच्यासाठी फायद्याचा सौदा आहे की नाही?
16
सदा सरवणकरांनी घेतली मुख्यमंत्री शिंदेंची भेट, माहिमच्या जागेवर चर्चा, मोठा निर्णय होणार?
17
IND vs NZ 3rd Test : न्यूझीलंडनं टॉस जिंकला, मॅच कोण जिंकणार?
18
गॅस सिलिंडर, UPI पेमेंट ते तिकीट बुकिंग; आजपासून बदलले 'हे' नियम बदलले, थेट खिशावर होणार परिणाम
19
आजचे राशीभविष्य : आज अवैध कामांपासून दूर राहावे, क्रोध आणि वाणीवर संयम ठेवावा लागेल
20
अमृता खानविलकरची स्वप्नपूर्ती! घेतलं नवीन घर, व्हिडीओ शेअर करत दाखवली झलक

काय आहे बायपोलर डिसऑर्डर स्थिती? ज्यात व्यक्तीला येतात आत्महत्येचे विचार...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 09, 2019 11:28 AM

अलिकडे वेगवेगळ्या कारणांनी लोक आत्महत्या करण्याच्या अनेक घटना आपण सतत ऐकत-वाचत असतो. पण हे नेमकं होतं कसं?

(Image Credit : Verywell Mind)

अलिकडे वेगवेगळ्या कारणांनी लोक आत्महत्या करण्याच्या अनेक घटना आपण सतत ऐकत-वाचत असतो. पण हे नेमकं होतं कसं? आत्महत्या करण्यापर्यंत त्यांचा विचार जातो कसा? असा प्रश्न अनेकांना पडत असेल. बायपोलर डिसऑर्डर हा एक असा मानसिक आजार आहे, ज्याने व्यक्तीचा मूड सतत बदलत राहतो. मूडमध्ये होणारे हे बदल सामान्य श्रेणीत येत नाहीत. या डिसऑर्डरने पीडित व्यक्ती अनेक महिने डिप्रेशनचे शिकार राहू शकतात किंवा फार जास्त काळ एंग्झायटीच्या(चिंता) स्थितीत राहू शकता.

काय आहेत लक्षणे?

(Image Credit : swissinfo.ch)

mayoclinic.org या वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार, बायपोलर डिसऑर्डरने पीडित व्यक्तीमध्ये तीन मुख्य लक्षणे दिसू शकतात. बायपोलर डिसऑर्डरने पीडित व्यक्तींमध्ये दिसणारी तीन मुख्य लक्षणे म्हणजे मॅनिया (mania), दूसरं हायपोमॅनिया (hypomania)आणि तिसरं डिप्रेशन.

(Image Credit : Practical Pain Management)

१) मॅनिया स्थितीत व्यक्ती इमोशनल रूपाने फार संवेदनशील होतो. भावनांवर त्यांचं जास्त नियंत्रण राहत नाही. त्यामुळे फार जास्त उत्तेजित, आवेग, फार जास्त आनंद आणि ऊर्जा त्यांना फार जास्त जाणवते. मॅनिया स्थितीदरम्यान व्यक्तीच्या कार्य आणि नात्यांवर सर्वात जास्त प्रभाव बघायला मिळतो. 

(Image Credit : Collective Evolution)

२) हायपोमॅनिया ही मॅनियापेक्षा कमी थोडी खालची स्थिती आहे. याला जास्त करून बायपोलर २ डिसऑर्डर म्हटलं जातं. या स्थितीमध्येही व्यक्ती मूडमध्ये फार बदल बघायला मिळतात. पण या स्थितीत व्यक्तीच्या कार्य आणि नाती मॅनेज करण्याच्या क्षमतेवर प्रभाव पडत नाही.

(Image Credit : KQED)

३) डिप्रेशनच्या स्थितीची व्यक्तीमध्ये फार जास्त उदास, निराश, ऊर्जेची कमी, वेगवेगळ्या गोष्टींमधील रस कमी होणे, फार जास्त किंवा कमी झोपे ही लक्षणे बघायला मिळतात. अशात व्यक्तीच्या मनात आत्महत्या करण्याचा विचार देखील येऊ शकतो. अशात या लक्षणांची ओळख लवकर पटवणे गरजेचं आहे.

उपचार

बायपोलर डिसऑर्डरने पीडित व्यक्तीला डॉक्टरच्या उपचारांची आवश्यकता असते. लक्षणे दिसायला लागली तर वेळीच पीडित व्यक्तीला डॉक्टरांकडे घेऊन जावे. जेणेकरून स्थिती हातातून बाहेर जाऊ नये. सामान्यपणे या आजाराने पीडित व्यक्तींना आयुष्यभर औषधांचा आधार घ्यावा लागतो.  औषधांचा डोज किती जास्त किंवा कमी असेल हे डॉक्टरांकडून वेळोवेळी केल्या जाणाऱ्या टेस्टवर अवलंबून असेल.

टॅग्स :Mental Health Tipsमानसिक आरोग्यHealthआरोग्य