(Image Credit : yummyyummybaby.com)
लायकोपीन कर्करोगावरील उत्तम उपाय मानला जातो. हा अॅंटी-ऑक्सिडेंट सामान्यपणे टोमॅटोमध्ये आढळतं. पण याव्यतिरीक्तही अनेक फळांमधून तुम्ही हे तत्व मिळवू शकता. लायकोपीन पोषक तत्त्वांचा राजा मानला जातो. कारण याचे आरोग्याला अनेक फायदे आहेत. खासकरुन याने कर्करोगासारखा गंभीर आजार रोखण्यासाठी मदत होते.
लायकोपीन काय आहे?
एका हेल्थ वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार, लायकोपीन एका फायटोन्यूट्रिएंट आहे. फायटोन्यूट्रिएंट हे काही झाडांमध्ये आढळणारं अॅंटी-ऑक्सिडेंट आहे, जे मानवी आरोग्यासाठी अनेकदृष्टीने फायदेशीर आहे. हे पोषत तत्व मूळ रुपाने मानवी शरीरात तयार केलं जातं नाही. हे टोमॅटो, पपई, कलिंगड आणि गुलाबी द्राक्ष यांसारख्या फळांना आणि भाज्यांना लाल रंग देतं. कारण हे एक मिश्रित होणारं पोषक तत्व आहे.
शुक्राणूंची संख्या वाढते
अनेक शोधांमधून हे समोर आलं आहे की, लायकोपीनचं नियमीतपणे सेवन करायला हवं. कारण याने पुरुषांमध्ये शुक्राणूंची संख्या वाढते. पण याचा प्रभाव किती होईल याबाबत पूर्णपणे स्पष्टता येणे बाकी आहे. पण तरीही टोमॅटोचा आहारात समावेश केला पाहिजे. जेणेकरुन शरीराला लायकोपीन मिळेल.
हाडांना मजबूती
हाडांना मजबूत करण्याचं काम केवळ व्हिटॅमिन के आणि कॅल्शिअम करत नाही. लायकोपीनमुळेही हाडांमधील ऑक्सीडेटीव तणाव दूर करण्यास मदत मिळते आणि कमजोर हाडांना मजबूती मिळते. त्यामुळे पुरुषांनी लायकोपीन असलेला आहार घेतला पाहिजे. याने एपोप्टोसिस(पेशी मृत्यू) कमी होतो. याने हाडांना मजबूती मिळते.
प्रोटेस्ट कॅन्सरचा धोका कमी
प्रोस्टेट कॅन्सर हा पुरुषांना होणाऱ्या तीन मुख्य कॅन्सरपैकी एक मानलं जातं. आज जगातल्या सर्वच देशातील पुरुषांमध्ये प्रोस्टेट कॅन्सरच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. हा प्रोस्टेट कॅन्सर लायकोपीनच्या सेवनाने रोखला जाऊ शकतो. प्रोस्टेट कॅन्सरने पीडित लोकांना कॅन्सर पेशींचा प्रसार कमी करण्यासाठी आणि त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी सर्जरीआधी एक लायकोपीन आहार ठरवला जातो.