लहानांपासून मोठ्यांपर्यंत अनेकांना कामाचा, अभ्यासाचा व्याप इतका वाढलेला असतो की या सगळ्यात स्वतःकडे लक्ष द्यायला मिळत नाही. खाण्यापिण्याची म्हणजे तुमच्या रोजच्या जेवणाची, नाष्त्याची आणि झोपेची वेळ निश्चीत नसणे हे खुपच कॉमन आहे. पण तुमच्या याच सवयी तुम्हाला महागात पडू शकतात.एका सुदृढ आणि चांगल्या शरीरासाठी पौष्टीक आहार घेणं फार महत्वाचं असतं. आहार हा दिवस उगवल्यापासून रात्री झोपेपर्यंत उर्जा देत असतो. कारण हाडांना आणि मासपेशींना मजबूत करण्यासाठी आपण काय खातो ते महत्वाचं असतं.
अनेकदा महिलांना तसंच पुरूषांना घरातील आणि ऑफिसची कामं संपेपर्यंत उशीर होत असतो. परिणामी जेवायला तसचं झोपायला उशीर होतो. त्यानंतरही असंख्य लोकं जेवण झाल्यानंतर झोप येईपर्यंत मोबाईलचा वापर करत असतात. त्यामुळे मेंदूवर नकारात्मक परिणाम होत असतो. पण तुमच्या सवयी जीवघेण्यासुद्धा ठरू शकतात. (हे पण वाचा:वाढतं वय लपवण्यासाठी महिला करतात फ्रिक्शन थेरेपीचा वापर, जाणून घ्या या थेरेपीबद्द्ल)
अनेक रिसर्चमधून ही बाब समोर आली आहे की रात्री उशीरापर्यंत काम केल्यामुळे तुम्हाला हृदयाशी संबंधीत आजार होण्याचा धोका वाढतो. कारण त्यामुळे शरीरातील फॅट्सचे प्रमाण वाढतं तसंच कॉलेस्ट्रॉल सुध्दा वाढतं. ज्या लोकांना रात्री उशीरापर्यत जेवण्याची सवय असते. त्यांना या आजारांचा धोका जास्त जाणवतो. रात्री उशीरापर्यंत जागून काम केल्याने किंवा रात्री उशीरा जेवल्याचा परिणाम तुमच्या झोपेवर होत असतो. त्यामुळे तुमचं वजन वाढतं. (हे पण वाचा:ऑफिसमध्ये बसून वजन वाढलय? 'या' उपायांचा वापर कराल तर आकर्षक दिसाल)
कॉलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढल्यामुळे हद्यावर ताण येत असतो. त्यामुळे भविष्यात ब्लॉकेज होण्याची शक्यता असते. याचे प्रमाण जास्त झाल्यास हृदयाशी संबंधित शस्त्रक्रिया करावी लागत असते. तज्ञांच्यामते तुमच्या शरीरातील रोगप्रतिकारतशक्ती कमी होण्याचे कारण तुमची झोप पूर्ण न होणे हे असतं. जर झोप पूर्ण झाली नाही तर रक्तदाब वाढण्याचा धोका वाढतो. त्यामुळे आजारांपासून लांब राहण्यासाठी रात्री उशीरा जेवणं टाळा.