अनेक देशांच्या संस्कृतीत असं शिकवलं जातं की मुलांनी बसून लघवी न करता उभं राहून लघवी करावी. वेगवेगळया देशांच्या आरोग्य विभागातून खरंच उभं राहून लघवी करणं पुरूषांसाठी चांगलं असतं का याबाबत सवाल उपस्थित करण्यात येत आहे. आज आम्ही तुम्हाला या मागचं शास्त्रिय कारण काय आहे याबाबत सांगणार आहोत.
पुरूषांना असं वाटत असतं की उभं राहून मुत्र विसर्जन करणे हे खूप सोपं आहे. पण असं अजिबात नाही. पुरूषांच्या उभं राहून लघवी करण्यामागे दोन कारणं आहेत. सगळ्यात पहिलं म्हणजे उभं राहून लघवी करत असाताना पुरूषांना संपूर्ण कपडे काढावे लागत नाहीत. तसंच पुरूषांचे यूरिनल्स क्यूबिकल्स कमी जागा व्यापातात. त्यामुळे कमी जागेत सुद्धा पुरूष ही क्रिया करू शकतात. आरोग्यतज्ञांच्या म्हणण्यानुसार लघवी करण्यासाठी ज्या स्थितीत आपण उभं राहत असतो. त्या स्थितीवर मुत्र बाहेर पडण्याचे प्रमाण अवलंबून असते.
आरोग्य चांगलं असलेल्या व्यक्तीला लघवी करण्यासाठी जोर लावण्याची गरज पडायला नको. पण अनेक पुरूषांना मुत्र विसर्जन करण्यासाठी समस्या निर्माण होते. प्लस वन नावाच्या सांईटिफीक पब्लिकेशनच्या अभ्यासानुसार ज्या पुरूषांच्या प्रोटेस्ट या अवयवात सुज आलेली असते. त्यांना लघवी करण्यासाठी त्रास होतो. म्हणून त्यांनी बसून लघवी करणं गरजेचं आहे.
या अभ्यासात निरोगी पुरूष आणि लोअर यूरिनरी ट्रॅक्ट सिम्टम्स LUTS या समस्येने ग्रस्त असलेल्या पुरूषांची तुलना करण्यात आली. LUTS ला प्रोटेस्ट सिंड्रोम असं सुद्धा म्हटलं जातं. यात असं दिसून आलं की LUTS चा सामना करणारे पुरूष जर बसून लघवी करत नव्हते. जर ते बसून लघवी करतील तर त्यांच्या यूरेथ्रल एरियाचा दबाव कमी होईल. त्यामुळे लघवी करण्यची क्रिया त्रासदायक न होता सरळ होईल.
(image credit-verywell health)
उभं राहून मुत्र विसर्जन करण्याचे दुष्परिणाम
पुरूष उभं राहून लघवी करत असतात तेव्हा बॅक्टेरिया इतर ठिकाणी पसरण्याचा धोका असतो. स्वच्छतेच्या अनुशंगाने उभं राहून लघवी करणं चागंल मानलं जात नाही. त्यामुळे पुरूषांनी बसून लघवी करणं त्याच्या आरोग्यासाठी उत्तम ठरेल. प्रोटेस्ट सिन्ड्रोम पासून सुद्धा लांब राहता येऊ शकतं. ( हे पण वाचा-झोपताना बेडजवळ ठेवा लिंबाचा कापलेला एक तुकडा, कल्पनाही केला नसेल असा होईल फायदा!)