अनेक लोकांना बॅक पेनचा म्हणजेच पाठदुखीचा त्रास सतावतो. हा त्रास कमरेच्या खालच्या बाजूला होतो त्यामुळे त्याला लो बॅक पेन असेही म्हणतात. यामध्ये कमरेच्या खालच्या भागात प्रचंड वेदना होतात आणि सूजही येते. अशावेळी चालताना-फिरताना किंवा उठताना-बसतानाही त्रास होतो. काहींना तर पाठीसोबतच पायाच्या टाचा आणि स्नायूंनाही वेदना होतात. असं होण्याचं मुख्य कारण म्हणजे जास्तीत जास्त वेळ बैठं किंवा उभं राहून काम करणं, शरीर अशक्त असणं, दैनंदिन जीवनातील अनियमितता किंवा वजनदार गोष्टी उचलणं यांमुळे ही समस्या निर्माण होते. त्याचप्रमाणे मधुमेह आणि हायपरटेंशन असणाऱ्या व्यक्तींनाही बॅक पेनचा त्रास होतो. जाणून घेऊयात बॅक पेनच्या समस्येवर परिणामकारक ठरणाऱ्या घरगुती उपायांबाबत...
आलं -
आल्यामध्ये असलेली अॅन्टी-इन्फ्लेमेटरी तत्व लो बॅक पेनवर गुणकारी ठरतात. त्यासाठी अर्धा चमचा काळी मिरीची पूड, दिड चमचा लवंगाची पूड आणि एक चमचा आल्याची पूड एकत्र करून त्याचा हर्बल टी बनवून प्या.
तुळस -
एक कप पाण्यामध्ये 8-10 तुळशीची पानं टाकून उकळून घ्या. ते पाणी थंड झाल्यानंतर त्यामध्ये एक चिमुटभर मीठ टाका. हे मिश्रण रोज थोडं थोडं प्या. त्यामुळे पाठीदुखी आणि कंबरदुखीवर आराम मिळेल.
बर्फाने शेक द्या -
बर्फाने शेकल्यामुळे दुखणं आणि सूज कमी होते. जेव्हा तुम्हाला कंबर दुखीचा त्रास सतावत असेल तेव्हा त्याठिकाणी बर्फाने शेक द्या. त्यामुळे थोड्या वेळासाठी तो भाग सुन्न होईल आणि तुम्हाला आरामही मिळेल. असं सतत थोड्या थोड्या वेळाने केल्यानं दुखण्याचा त्रास कमी होईल.
दूध -
दूध हा कॅल्शिअमचा सर्वात मोठा स्त्रोत आहे. जे हाडं आणि स्नायूंना मजबूत करण्याचं काम करतो. शरीरातील कॅल्शिअमच्या कमतरतेमुळेही कंबरदुखीचा त्रास होतो.
योगा -
योगा शरीराला फिट ठेवण्यासाठी आणि तणाव कमी करण्यासाठी लाभदायक आहे. दररोज नियमितपणे सकाळी आणि संध्याकाळी योगा केल्यानं बॅकपेनचा त्रास दूर होतो.