टीबी हा एक गंभीर संसर्गजन्य आजार असून दरवर्षी लाखो लोक या आजाराच्या जाळ्यात अडकतात. या आजारावर वेळीच उपचार न केले गेल्यास हा आजार जीवघेणा ठरू शकतो. टीबीचे बॅक्टेरिया मुख्यत्वे लंग्सला प्रभावित करतात, ज्यामुळे व्यक्तीला श्वसनासंबंधी अनेक समस्यांचा सामना करावा लागतो.
ट्यूबरकोलॉसिस म्हणजेच टीबीचा बॅक्टेरिया सहजपणे समोरील व्यक्तीच्या शरीरात प्रवेश करू शकतो. सामान्य सर्दी किंवा खोकल्याप्रमाणे हे बॅक्टेरिया शरीराला इंफेक्ट करत निरोगी व्यक्तीला आपल्या जाळ्यात घेतात. आता अनेकांना हा प्रश्न पडतो की, टीबी हा आजार कुणाला जास्त प्रभावित करतो? चला जाणून घेऊ या प्रश्नाचं उत्तर....
कुणाला सर्वात जास्त धोका?
- टीबीचे बॅक्टेरिया एकाएकी शरीराला इंफेक्ट करू शकत नाहीत. जेव्हा एखादी निरोगी व्यक्ती टीबीने संक्रमित व्यक्तीच्या सानिध्यात जास्त राहत असेल तर टीबीचे बॅक्टेरिया शरीरावर अटॅक करतात. हेच कारण आहे की, परिवारातील लोक, मित्र आणि ऑफिसमध्ये काम करणारे लोक संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आल्याने टीबीचे बॅक्टेरिया शरीरात जाण्याचा धोका अधिक असतो.
- लहान मुलेही टीबीच्या जाळ्यात येण्याचा धोका अधिक असतो. याचं कारण म्हणजे लहान मुलांचं इम्यून सिस्टीम मोठ्यांसारखं जास्त मजबूत नसतं. अशात त्यांना टीबीचे बॅक्टेरिया लवकर जाळ्यात घेऊ शकतात.
- ज्या भागात टीबीचे जास्त रूग्ण आहेत, तिथे प्रवास केल्याने किंवा वारंवार भेट दिल्यानेही तुम्हाला टीबीचं संक्रमण होण्याचा धोका अधिक असतो.
- मेडिकल विश्वात काम करणाऱ्या लोकांना हा आजार होण्याचा धोका अधिक असतो. त्यांना टीबीने प्रभावित रूग्णांच्या उपचारासाठी त्यांच्या आजूबाजूला रहावं लागतं. इथे थोडं जरी दुर्लक्ष केलं तर टीबीचे बॅक्टेरिया शरीरात जाण्याचा धोका असतो.
- जे लोक एचआयव्हीने पीडित आहेत, ते लोक टीबीच्या बॅक्टेरियाचे सहजपणे शिकार होतात. एचआयव्हीने संक्रमित व्यक्तीचं इम्यून सिस्टीम कमजोर होतं. ज्यामुळे त्यांच्या शरीराला आजारांशी लढण्यास अडचण येते. हेच कारण आहे की, असे लोक टीबीचे शिकार लवकर होतात.
- जे व्यक्ती कुपोषणाचे शिकार आहेत, त्यांनाही टीबी होण्याचा धोका अधिक राहतो. शरीराला पूर्ण पोषण न मिळाल्याने त्यांची रोगप्रतिकार शक्ती कमजोर होते.
- मद्यसेवन आणि सिगारेट जास्त सेवन केल्याने टीबी होण्याचा धोका अधिक असतो. WHO च्या एका रिपोर्टनुसार, सिगारेट आणि मद्यसेवन करणाऱ्या लोकांना टीबीचं संक्रमण होण्याचा धोका अधिक असतो.