(Image Credit : runtastic.com)
श्री. गिरिश बिंद्रा, एसिक्स रनिंग क्लबचे कोच
धावपटू किंवा रनर म्हणून तुम्ही तुमचा वेग आणि तुमची टिकून राहाण्याची क्षमता यासाठी प्रयत्न करू शकाल. पण, तुमच्या फॉर्मवर, तुमच्या कामगिरीवर कधी लक्ष दिलंय? अनेक धावपटूंसाठी धावण्यातील गंमत त्यातील सहजतेमध्ये असते. मोकळा वेळ मिळाला की ते लगेच तयारी करून धावायला बाहेर पडतात. अधिक चांगल्या पद्धतीने, वेगाने, डोंगरावर आणि दीर्घ पल्ल्यात धावून ते दररोज स्वत:ला एक नवं आव्हान देतात. मात्र, दुर्दैवाने अनेक रनर्सकडून दुर्लक्षित राहिलेली बाब म्हणजे त्यातील तंत्रांचा किंवा टेक्निक्सचा सराव.
(Image Credit : runnerclick.com)
एसिक्स रनिंग क्लबचे कोच श्री. गिरिश बिंद्रा यांनी धावताना तुमच्या शरीराच्या आवश्यक असलेल्या स्थितीचं महत्त्व विषद केलं आहे. धावण्यातील तुमची परिणामकारकता वाढवून दुखापतीची शक्यता कमी करण्यासाठी त्यांनी काही टिप्सही दिल्या आहेत.
धावतानाच्या योग्य स्थितीमुळे रनरला फायदा होतो
धावण्याची परिणामकारक पद्धत कायम राखता येते
फुफ्फुसांची क्षमता आणि धावतानाचे पायांमधील अंतर वाढते
धड अधिक बळकट असल्यास अधिक रोटेशनसह कमी ऊर्जा वापरली जाते
धावण्याची परिणामकारक पद्धत कायम राखली जाते, फुफ्फुसांची क्षमता वाढते आणि अधिक रोटेशनसह तुमची कमी ऊर्जा खर्ची पडतेमी नेहमीच सगळ्यांना 'रन टॉल' ही युक्ती सांगतो - म्हणजेच शरीराची कमाल उंची राखत धावा आणि तुमची पाठ आरामदायक वाटेल अशा पद्धतीने सरळ ठेवा.
धावताना शरीराची योग्य स्थिती राखण्यासाठी या बाबी महत्त्वाच्या आहेत :
डोके : सरळ समोर पहा आणि हनुवटी वर ठेवा. डोके खाली झाले म्हणजे शरीर वाकण्यास सुरुवात होते.
खांदे : खांदे खाली आणि मोकळे सोडा - खांदे वर होताहेत, कडक होताहेत असं वाटल्यास लगेचच थोडं स्ट्रेचिंग करा आणि खांद्यामधील ताठरता कमी करा
(Image Credit : shoecue.com)
बाहू : तुमचे बाहू नेहमी मागेपुढे हलायला हवेत, डावी-उजवीकडे नव्हे. हाताचे कोपरे ९० अंशांमध्ये वळलेले असावेत. यामुळे, परिणामकारकता वाढते.
हात : मुठी कधीही गच्च आवळू नका. त्यामुळे शरीराच्या वरच्या भागात ताण निर्माण होतो.
आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे धड. शरीराचा हा मुख्य भाग सरळ ठेवा. त्यामुळे तुम्ही नेहमीच कमाल उंची राखत धावाल. वाकताय असं वाटलं तर दीर्घ श्वास घ्या आणि पहा... तुम्ही पुन्हा अगदी ताठ मानेने धावत असाल.