(Image Creadit : top.mn)
सध्या वातावरणामध्ये गारवा वाढत चालला आहे. पहाटे पडणाऱ्या गुलाबी थंडीत सकाळी उठणं अशक्य होतं. अशातच लवकर झोपेतून उठण्याचा प्रयत्न केलाच तर मात्र या थंड वातावरणात आंघोळ करणं अशक्य होतं. अनेक लोकं गारव्यामध्ये एकदम गरम पाण्याने आंघोळ करतात. तर काही लोक दुपारी जेवण झाल्यानंतर आंघोळ करतात. परंतु असं करणं आरोग्यासाठी हानिकारक ठरतं. जाणून घेऊयात जेवणानंतर आंघोळ केल्यामुळे शरीराला होणाऱ्या अपायांबाबत...
शरीराचे नियम :
आपल्या शरीराचेही काही नियम असतात. त्यानुसार जर आरोग्य राखलं तर त्याचे शरीरावर विपरित परिणाम होत नाहीत. परंतु त्याविरूद्ध केलेली कामं शरीरासाठी नुकसानदायक ठरतात. आपलं आरोग्य चांगलं राखण्यासाठी आपल्या डाएटमध्ये पौष्टीक पदार्थांचा समावेश करण्याचा प्रत्येकाचाच प्रयत्न असतो. परंतु फक्त एवढचं पुरेसं नसतं. जसं आपलं वेळेवर जेवणं आणि त्याचं व्यवस्थित पचन होणं जसं शरीरासाठी आवश्यक असतं. त्याचप्रमाणे जेवणानंतर आपण आपल्या नकळत अशी काही कामं करतो जे आपलं आरोग्य बिघडवण्यासाठी कारणीभूत ठरतात.
जेवणानंतर आंघोळ करणं टाळा :
जेवणानंतर लगेच आंघोळ करणं टाळा. असं करणं शरीराच्या दृष्टीने हानिकारक असतं. जर जेवल्यानंतर तुम्ही आंघोळ करत असाल तर पोटातील रक्तप्रवाह वाढतो. त्यामुळे पचनक्रियेवर परिमाण होतो. परिणामी शरीर अस्वस्थ होतं.
या गोष्टींपासूनही दूर रहा :
सिगारेट :
जर तुम्ही जेवणानंतर सिगरेट घेत असाल तर हे आरोग्यासाठी हानिकारक ठरतं. त्यामुळे कॅन्सरचा धोका वाढतो.
फळांचं सेवन करणं टाळा :
अनेक लोकं जेवणानंतर लगेच फळं खातात. फळं खाणं आरोग्यासाठी फायदेशीर ठरतं असं असलं तरीही जेवणानंतर लगेचचं फळं खाणं टाळा. जर जेवल्यानंतर लगेच फळं खाल्ली तर त्याचा योग्य लाभ शरीराला मिळत नाही. उलट त्याचे अनेक तोटे होतात. त्यामुळे जेवणानंतर कमीतकमी एक तासानंतर फळांचं सेवन करावं.
चहा :
चहाच्या पानांमध्ये मोठ्या प्रमाणावर अॅसिडिक पदार्थ असतात. जर तुम्ही जेवणानंतर लगेचच चहाचं सेवन करत असाल तर त्याचा पचनक्रियेवर वाईट परिणाम होतात. त्यामुळे जेवणं पचण्यास व्यत्यय येतो. जेवणानंतर जवळपास 2 तासांनी चहाचं सेवन करू शकता.