मॅग्नेशिअम एक अशा प्रकारचं रासायनिक तत्व आहे, जे शरीरासाठी अत्यंत फायदेशीर ठरतं. मॅग्नेशिअम आपल्या शरीरात आढळून येणाऱ्या पाच प्रमुख तत्वांपैकी एक आहे. संपूर्ण शरीरातील अर्ध्यापेक्षा अधिक मॅग्नेशिअम आपल्या हाडांमध्ये आढळून येतं. आणि उरलेलं मॅग्नेशिअम शरीरामध्ये होणाऱ्या इतर जैविक क्रियांमध्ये मदत करतं. साधारणतः आपल्या आहारामध्ये मॅग्नेशिअमचं प्रमाण मुबलक प्रमाणात असणं गरजेचं असतं. मॅग्नेशिअम हिरव्या पालेभाज्या आणि ड्राय फ्रुट्समध्ये असतं. जाणून घेऊया मॅग्नेशिअममुळे शरीराला होणाऱ्या फायद्यांबाबत...
स्मरणशक्तीसाठी उपयोगी
जेवणामध्ये मॅग्नेशिअमचं प्रमाण मुबलक प्रमाणात असेल तर त्यामुळे स्मरणशक्ती उत्तम राहण्यास मदत होते. एका मासिकातून प्रकाशित करण्यात आलेल्या वृत्तानुसार, स्मरणशक्ती वाढविण्यासाठी शरीरातील मॅग्नेशिअमची पातळी वाढविणं उत्तम उपाय असू शकतो. मॅग्नेशिअम मेंदूसहीत शरीरातील अनेक पेशींचं काम सुरळीत चालण्यासाठी मदत करते. त्यामुळे स्मरणशक्तीची क्षमता वाढविण्यासाठी मॅग्नेशिअमचं सेवन भरपूर प्रमाणात करणं आवश्यक ठरतं.
ऑस्टियोपोरोसिसपासून बचाव
जर हाडांमधील मॅग्नेशिअमची पातळी कमी झाली तर त्यामुळे हाडं कमजोर होतात आणि ऑस्टियोपोरोसिस होण्याची शक्यताही वाढते. संपूर्ण शरीरातील अर्ध्यांहून अधिक मॅग्नेशिअम आपल्या हाडांमध्ये आढळून येतं. अनेक संशोधनातून ही गोष्ट समोर आली आहे की, मॅग्नेशिअम हाडांचा आजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ऑस्टियोपोरोसिसपासून बचाव करण्यासाठी फायदेशीर ठरतो.
हृदयाचे आरोग्य राखण्यासाठी
मॅग्नेशिअम हृदयाचे आरोग्य चांगले राखण्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतं. कोरोनरी हार्ट डिजीजपासून बचाव करण्यासाठी मॅग्नेशिअमचं सेवन करणं आवश्यक असतं. जर शरीरामधील मॅग्नेशिअमचे प्रमाण कमी झालं तर हृदय रोगाचा धोका वाढतो. त्यामुळे हृदयाचे आरोग्य चांगलं राखण्यासाठी आहारामध्ये मॅग्नेशिअमचा समावेश करणं आवश्यक असतं.
हायपरटेंशनपासून बचाव करण्यासाठी
मॅग्नेशिअम रक्तदाबावर नियंत्रण ठेवण्यासाठी उपयोगी ठरतं. तसचे हायपरटेंशनपासून बचाव करण्यासाठी मदत करते. त्यामुळे रक्तप्रवाह सुरळीत ठेवण्यासाठी ताजी फळं आणि हिरव्या पालेभाज्यांचं सेवन करा.
मधुमेहावर परिणामकारक
एका संशोधनातून असं सिद्ध झालं आहे की, शरीरामध्ये मॅग्नेशिअमची कमतरता असेल तर त्यामुळे टाइप-2 डायबिटीज होण्याता धोका असतो. त्यामुळे मधुमेहासारख्या गंभीर आजारांपासून बचाव करण्यासाठी मॅग्नेशिअमयुक्त आहार घेणं आवश्यक असतं.
डोकोदुखी आणि अनिद्रा
मॅग्नेशिअमच्या कमतरतेमुळे डोकेदुखी, अनिद्रा, ताण इत्यादी समस्यांचा सामना करावा लागू शकतो. याव्यतिरिक्त मनसिक आजारांपासून सुटका करण्यासाठीही मॅग्नेशिअम गरजेचं असतं. त्यामुळे या सर्व समस्यांपासून सुटका करण्यासाठी आहारामध्ये मॅग्नेशिअमचा समावेश करा.
गरोदरपाणात अत्यंत फायदेशीर
गर्भवती महिला आणि तिच्या बाळासाठी मॅग्नेशिअम अत्यंत फायदेशीर असतं. गरोदरपणात आईच्या पोटात वाढत असलेल्या बाळाच्या पेशींसाठी 350 ते 400 मिग्रा मॅग्नेशिअमची गरज असते. गरोदरपणात मॅग्नेशिअमच्या कमतरतेमुळे बाळाच्या विकासात अडथळा होऊ शकतो.
मॅग्नेशिअमची पातळी वाढविण्यासाठी
धान्य, हिरव्या पालेभाज्या, सुर्यफुलाच्या बीया, भोपळ्याच्या बीया, ब्राउन राइस, बदाम, दलिया, बटाटा, दही, चॉकलेट, कॉफी यांसारखे पदार्थ मॅग्नेशिअमचा उत्तम स्त्रोत असतात. त्यामुळे याचं सेवन मुबलक प्रमाणात करणं गरजेचं असत.