महिलांना येणारी मासिक पाळी हे एक नैसर्गिक चक्र असतं. यामध्ये घाबरण्यासारखं काही नसतं. साधारणतः महिलांचं मासिक चक्र 28 दिवसांचं असतं. पण अनेकदा वेगवेगळ्या कारणांमुळे मासिक पाळी उशिरा येते. पण तुम्हाला माहित आहे का? मासिक पाळी उशिरा येण्याची अनेक कारणं असतात. पण अनेकदा हार्मोन चेंजेसमुळे मासिक पाळी उशिरा येते. पण तुम्हाला माहित आहे का? योग्य डाएट न घेतल्यानेही मासिक पाळी उशिरा येण्याच्या समस्येचा सामना करावा लागतो. जर तुम्ही योग्य डाएट घेतलं नाही तर त्याचा परिणाम तुमच्या मासिक पाळीवर होतो. त्यामुळे पिरियड्स वेळेवर येण्यासाठी आपल्या आहारामध्ये काही पदार्थांचा समावेश करणं फायदेशीर ठरतं. जाणून घेऊया त्या पदार्थांबाबत...
कच्ची पपई
मासिक पाळीच्या समस्या दूर करण्यासाठी कच्ची पपई फायदेशीर ठरते. यामध्ये अनेक पोषक तत्व, अॅन्टीऑक्सिडंट आणि आजार ठिक करणारे गुणधर्म असतात. कच्च्या पपईचे सेवन केल्याने मासिक पाळीशी निगडीत असणाऱ्या सर्व समस्या दूर होतात.
आलं
मासिक चक्र नियमित करण्यासाठी आलं अत्यंत लाभदायक ठकतं. यामुळे पिरियड्समध्ये होणाऱ्या वेदना दूर होण्यास मदत होते. त्यासाठी अर्धा चमचा आलं किसून घ्या आणि 1 कप पाण्यासोबत 7 मिनिटांसाठी उकळत ठेवा. आता यामध्ये थोडीशी साखर एकत्र करा आणि जेवण झाल्यानंतर दिवसातून तीन वेळा याचे सेवन करा. असं एक महिनाभर केल्याने सर्व समस्या दूर होतात.
जीरं
मासिक पाळीमध्ये होणाऱ्या समस्यांमध्ये जीरं फार फायदेशीर ठरतं. याव्यतिरिक्त मासिक पाळीमध्ये होणाऱ्या वेदनांपासून सुटका देण्यासाठी मदत करतात. यामुळे तुम्हाला आयर्न मिळतं. जे महिलांच्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतं. कारण मासिक पाळीमध्ये होणाऱ्या रक्तस्त्रावामुळे महिलांच्या शरीरात रक्ताची कमतरता निर्माण होते. ही कमतरता भरून काढण्यासाठी आयर्न मदत करतं. एक चमचा जीऱ्यासोबत एक चमचा मधाचं सेवन करणं फायदेशीर ठरतं.
बदाम
रात्री दोन खजूर आणि 4 बदाम पाण्यामध्ये भिजत ठेवा. सकाळी यासोबत थोड्याशा खडीसोखरेसोबत बारिक करा आणि लोण्यासोबत याचे सेवन करा. यामुळे मासिक पाळीच्या सर्व समस्या दूर होऊन जातात.
टिप : या लेखात सुचवण्यात आलेल्या टिप्स आणि सल्ले केवळ तुमच्या माहितीसाठी आहेत. याकडे तुम्ही प्रोफेशनल सल्ला या रूपाने बघू शकत नाहीत. कोणत्याही प्रकारचं फिटनेस प्रोग्राम सुरू करण्यापूर्वी किंवा डाएटमध्ये कोणत्याही प्रकारचं बदल करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्यावा.